शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यासाठी १०० कोटींचा कृषी आराखडा : चोरगे

By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST

अन्य व्यवसायांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेती संस्थांनी आता ‘खावटी कर्ज’ देणे या एकाच कामातून बाहेर पडावे व विविध कार्य करण्याचा या सोसायट्यांचा उद्देश सफल करण्यासाठी अन्य व्यवसायांना कर्जपुरवठा करण्यासाठी पुढाकार घ्यावा. त्यातून त्यांच्या विभागाचा आर्थिक विकास साधणे शक्य होईल. यावर्षी जिल्हा बॅँकेने शंभर कोटींचा कृषी आराखडा तयार केल्याचे प्रतिपादन बॅँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे यांनी केले. बॅँकेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात त्यांच्या हस्ते जिल्ह्यातील ३८० पैकी निवडक ५६ विकास संस्थांना संगणक व प्रिंटर बॅँकेतर्फे भेट देण्यात आले. त्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर बॅँकेचे उपाध्यक्ष बाबाजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश दिवाकर, संचालक अ‍ॅड. दीपक पटवर्धन तसेच अन्य संचालक उपस्थित होते. जिल्ह्यातील ७ खरेदी -विक्री संघांनाही संगणक भेट देण्याचा बॅँकेचा प्रस्ताव असल्याचेही चोरगे यांनी सांगितले. यावेळी ५६ कार्यकारी संस्थांना संगणक, प्रिंटर व त्यासाठी लागणारी सॉफ्टवेअर्सही बॅँकेला झालेल्या नफ्यातून देण्यात आली. उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी सांगितले की, ५६ संस्थांप्रमाणेच अन्य चांगले काम करणाऱ्या विकास सोसायट्यांनाही अध्यक्षांनी संगणक देण्याचा विचार करावा. संगणकामुळे विकास संस्थांचे काम सोपे होईल, असेही जाधव म्हणाले. (प्रतिनिधी)जिल्हा बॅँकेस आयएसओरत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या गेल्या कारकिर्दीतील चांगल्या कामांची दखल घेण्यात आली आहे. या बॅँकेला आयएसओ दर्जा प्रमाणपत्र मिळाले आहे. राज्यात सातारा, रायगड व रत्नागिरी या तीन बॅँकांना हे मानांकन मिळाले आहे, अशी माहिती डॉ. चोरगे यांनी दिली.