शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

‘मासेमारी बंद’नंतर आता लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 01:45 IST

बंदरे, मच्छीमारी शांत : ज्येष्ठ, आषाढातच लागतात विवाहाचे वेध

जैतापूर : पावसाच्या आगमनाने आणि शासनाच्या बंदी आदेशामुळे खोल समुद्रातील मासेमारी बंद झाली...नौका किनाऱ्यावर स्थिरावल्या...आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीसह राजापूर तालुक्यातील बंदरेही काही काळासाठी शांत झाली आहेत. तुळसुंदेसह जिल्ह््यातील अन्य खारवी समाजाची वस्ती असलेल्या गावातून सध्या लगीनघाई सुरू झाली आहे.राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या जिल्ह्यातील मोठ्या बंदरासह तुळसुंदे, दांडे-अणसुरे, सागवे, कातळी, नाणार या प्रमुख बंदरांसह खाडीअंतर्गत लहान-लहान गावातून लहान मोठ्या यांत्रिक, बिगर यांत्रिक होड्या, लाँचेस, पर्ससीन नेट आदींद्वारे मासेमारी व्यवसाय चालतो. नारळी पोर्णिमा ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खाडीसह खोल समुद्रात चालणाऱ्या या व्यवसायामुळे बंदरांच्या गावांबरोबरच आजूबाजूच्या गावांमधील बाजारपेठाही गजबजलेल्या दिसतात. मात्र, बंदीच्या तीन महिन्यांच्या कालावधीत मात्र किनारपट्टीलगतच्या अनेक गावांतून मात्र मंदी जाणवते.राजापूर तालुक्यातील एकमेव खारवी समाजाचे गाव असलेल्या तुळसुंदे गावात मात्र मासेमारी बंदी काळात मोठी धावपळ, गडबड असते. त्याला कारणही तसेच आहे. अनेक बंदरांतून या काळात शांतता असताना तुळसुंदे गावात मात्र लगीनघाईची गडबड दिसून येते. काही वर्षांपूर्वी तुळसुंदेदेखील नावाजलेले मच्छीमारी केंद्र होते. मोठ्या प्रमाणावर गावात सधन समाजाची वस्ती होती. गावात प्रत्येक सण मोठ्या धामधुमीत साजरा होत असे. मात्र, गेल्या पंधरा वर्षांपासून दुष्टचक्रात अडकलेला मच्छीमार बांधव पुन्हा सावरू शकलेला नाही. अन्यत्र ऐन चैत्र -वैशाखात लगीनसराई असताना कामानिमित्त बाहेर असलेल्या खारवी समाजात मात्र ज्येष्ठ - आषाढात लगीनसराई असते. समुद्रात बोटींवर कामाला असणाऱ्या खलाशांबरोबरच मुंबई-पुणेसारख्या शहरात असलेला खारवी समाजबांधव पावसाळयातील या महिन्यात गावी येतो. मुसळधार पडणाऱ्या वरूणराजाच्या साक्षीने नवपरिणित वर-वधूंवर अक्षता पडतात. आता खारवी समाज बांधवांमध्ये लगीनघाई सुरु झाली आहे. (वार्ताहर)पावसाळयातील दोन-अडीच महिन्यांच्या कालावधीत गावात म्हामदा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जातो. यावर्षी तुळसुंदे गावात ग्रामपंचायत निवडणुकीचीही गडबड असल्याने जोरदार शक्ती प्रदर्शनासाठी राजकीय पक्षांकडूनही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामध्ये तळीरामांची मात्र चांगलीच चंगळ होणार आहे.