शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढलेला असतानाच आता आणखी एका झिका नावाच्या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढलेला असतानाच आता आणखी एका झिका नावाच्या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. केरळ राज्यात झिकाचे रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात झिकाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तरीही शासनाकडून आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यादृष्टीने आरोग्य यंत्रणेकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. मात्र जानेवारी, २०२१ पासून जिल्ह्यात डासांमुळे होणाऱ्या डेंग्यू, मलेरियाचा संसर्ग झालेला नाही. जिल्ह्यात खेड तालुक्यात मे महिन्यामध्ये केवळ २ डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. हे आजार एडिस इजिप्त डासांपासून होत असून, झिका हा आजार हेच डास चावल्यामुळे होतो. तसेच याच डासांमुळे चिकुन गुनिया हा रोगही होतो.

आरोग्य यंत्रणा दिवस-रात्र करीत असलेल्या मेहनतीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका अजूनही टळलेला नसताना केरळमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. झिकाचे संकट अजून जिल्ह्याच्या सीमेवर आले नसले तरी आरोग्य यंत्रणेला आतापासूनच दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

झिका व्हायरसमध्ये रोगप्रतिकार शक्तीवर गंभीर परिणाम होतो. हा डास चावल्याच्या आठवडाभरानंतर लक्षणे दिसू लागतात. गर्भवती महिलांमध्ये हा संसर्ग विकसनशील गर्भास गंभीरपणे हानी पाेहोचवू शकतो. त्यामुळे मेंदूची अपुरी वाढ झालेल्या बाळाचा जन्म होण्याची शक्यता अधिक असते. लहान मुलांच्या मेंदूवर या आजाराचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता असते.

झिकाची लक्षणे असलेला एकही रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात सापडलेला नाही. असे असले तरी या व्हायरसचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी सांगितले.

डास चावल्यास झिका विषाणूची लागण होते. मात्र, झिकाची लागण होणारा डास आपल्याकउे अद्याप आढळून आलेला नाही. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेने औषण फवारणीला प्राधान्य दिले आहे. शिवाय जिल्ह्यातील साप्ताहिक आरोग्य सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंतच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालात झिकाची लक्षणे असलेला रुग्ण सापडलेला नाही.

- डॉ. संतोष यादव,

जिल्हा हिवताप अधिकारी,

रत्नागिरी.

कशामुळे हाेताे?

एडिस इजिप्त जातीच्या डास चावल्याने झिका विषाणूची लागण होते. एखाद्या डबक्यात पावसाचे पाणी साचल्याने या पाण्यावर ४ ते ५ दिवसांत या डासांची उत्पत्ती होते. हे डास अत्यंत घातक असतात. एडिस इजिप्त प्रकारातील झिका विषाणू पसरविणारा हा डास आहे. यामुळे पावसाळ्यात झिकाचा अधिक धोका असतो. या प्रकारच्या डासांमुळे चिकन गुनिया, डेंग्यूसारखा आजारही होतो.

झिकाची लक्षणे?

कोरोना संसर्गामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता झिका या नव्या आजाराने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा आजार डासांपासून होत असून ताप येणे, अंगावर पुरळ येणे, सांधे दुखणे, डोळे लाल होणे आणि अंग दुखणे आदी लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांकडून वेळीच उपचार घ्यावेत. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे परस्पर घेऊ नयेत.