शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत चाळीस नौकांवर कारवाई

By admin | Updated: June 22, 2016 00:08 IST

बंदी आदेशाचा भंग : वरवडेतील प्रकार; नौका मालकांवर खटले

रत्नागिरी : ‘पावसाळी मासेमारी बंदी आदेश’ मोडून समुद्रात मासेमारीला गेलेल्या वरवडे येथील ४० पारंपरिक यांत्रिक नौका मंगळवारी मत्स्यव्यवसाय खात्याने पकडल्या. या नौकांवरील १६ हजार रुपये किमतीचे मासे जप्त करण्यात आले. पकडलेल्या सर्व नौकांच्या मालकांविरोधात तहसीलदारांकडे खटले दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.सागरी व खाड्यांमधील मासेमारीवर पावसाळ्याच्या काळात शासनाने बंदी घातली आहे. १ जून २०१६ पासून ही बंदी सुरू झाली असून, ३१ जुलै रोजी बंदीकाळ संपुष्टात येणार आहे. पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे मासेमारीला जाणे मच्छिमारांच्या जीविताला धोका निर्माण करणारे आहे. तसेच पावसाळ्याच्या कालावधीत मासे किनाऱ्यावरील पाण्यात प्रजननासाठी येतात. अशावेळी मासेमारी केल्यास नवीन मत्स्यजीव मारले जातात व त्याचा पुढील मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याचे याआधी निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या कालावधीत मच्छिमारीवर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. बंदी असतानाही जिल्ह्यात काही ठिकाणी अद्यापही छुप्या पद्धतीने यांत्रिक नौकांद्वारे मच्छिमारी केली जात असल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातही रत्नागिरीसह वरवडे, जयगड, कासारवेली या भागातील काही मच्छिमार दोन सिलिंडरची यंत्रे असलेल्या पारंपरिक नौकांद्वारे मच्छिमारी करून बंदी मोडत असल्याच्या तक्रारी काही मच्छिमारांकडूनच मत्स्यव्यवसाय खात्याकडे करण्यात आल्या आहेत. राजिवडा येथील मच्छिमारांनीही ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमाच्यावेळी मासेमारी बंदी मोडणाऱ्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर मत्स्यव्यवसाय खात्यानेही अशा बंदी मोडणाऱ्यांविरोधात मोहीम राबविण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ही पहिलीच कारवाई वरवडे येथे करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी या ४० मासेमारी नौका समुद्रात गेल्या होत्या. याची माहिती मिळताच त्या परत येण्याच्या वेळेआधी मत्स्यव्यवसाय खात्याचे पथक वरवडे जेटी येथे पोहोचले. मासेमारी करून परतलेल्या सर्व नौकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये मत्स्यव्यवसाय खात्याचे अधिकारी डी. जे. जाधव, कर्मचारी कृष्णसिंह रघुवंशी, सुरक्षा पर्यवेक्षक धीरज चव्हाण, तुषार करगुटकर, सुशील वैद्य आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)मत्स्यव्यवसाय खात्याची अन्य ठिकाणेही हिटलिस्टवररत्नागिरीसह जिल्ह्यातील किनारपट्टी भागात यांत्रिक नौकांद्वारे मासेमारी करून बंदी आदेशाचा भंग केला जात असल्याची चर्चा आहे. याबाबत मत्स्यव्यवसाय खात्याकडे तक्रारीही आल्या आहेत. मात्र मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय खात्याकडून कारवाईच होत नसल्याने या खात्याकडूनच त्यांना अभय असल्याचा आरोप मच्छिमारांमधून केला जात आहे.