शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक साहित्य चोरी प्रकरणातील आरोपी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:21 IST

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील सबारी इंजिनिअरिंग खडी क्रशर प्लांटचे इलेक्ट्रिक साहित्य चोरी प्रकरणातील आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी उत्तर ...

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील सबारी इंजिनिअरिंग खडी क्रशर प्लांटचे इलेक्ट्रिक साहित्य चोरी प्रकरणातील आरोपीला संगमेश्वर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. छत्रू सकलदीप यादव (रा. यल्ला पेले निर्मल, अदलाबाद, तेलंगाणा) असे ताब्यात घेतलेल्या चाेरट्याचे नाव आहे. त्याला देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

याप्रकरणी प्रवीण नागजीभाई पटेल (रा. आरवली रेल्वे स्टेशनजवळ, ता. संगमेश्वर) यांनी २१ जून रोजी चोरीप्रकरणी फिर्याद दिली होती. मुंबई - गोवा महामार्गावरील कडवई गावी गणपती मंदिराजवळ सबारी इंजिनिअरिंग खडी क्रशर कंपनीचा प्लांट आहे. सबारी कंपनीमधील कंटेनर बॉक्समध्ये बसविलेले १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे क्रशर प्लांटचे इलेक्ट्रिक साहित्य छत्रू यादव याने २० जून रोजी सायंकाळी ४ वाजता चाेरून नेले हाेते.

छत्रू यादव याने कामाला असताना तेलंगणा येथील पत्ता दिला होता. त्यानुसार संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे तपास करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. जी. कांबळी, पोलीस हेड काॅन्स्टेबल संतोष झापडेकर, प्रशांत मसूरकर, सचिन कामेरकर यांचे पथक फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी तेलंगणा येथे रवाना झाले होते.

आरोपी छत्रू यादव याला मोबाइल लोकेशनवरून बिजोरा धोबीपुरा (ता. जंगीपूर, जि. गाजीपूर, राज्य उत्तर प्रदेश) येथून २८ रोजी ताब्यात घेतले. १ लाख ९५ हजार रुपये किमतीचे साहित्य पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतले आहे. छत्रू यादव याला अटक करून त्याला ३० रोजी देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीशांनी तीन दिवसांची पोलीस काेठडी सुनावली होती. ही काेठडी संपताच त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे.