शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

अपघातानं स्मृती हरवली, पण कष्टानं यश गवसलं!

By admin | Updated: June 19, 2014 01:11 IST

नीलय अनगोळकर : ‘तो’ परिस्थितीशी झगडला, पण वाकला नाही... एका जिद्दीनं लढणाऱ्या तरूणाची कहाणी

मेहरुन नाकाडे / रत्नागिरी अपघातामध्ये मेंदूला लागलेला जबर मार त्यामुळे हरवणारी स्मृती परंतु शिक्षकवृंदाचे प्रोत्साहन, आईचे पाठबळ यामुळेच कणकवलीच्या नीलय जगदीश अनगोळकर या विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत यश संपादन केले आहे. इयत्ता सहावीमध्ये शाळेत जाताना झालेल्या अपघातात नीलय याच्या मेंदूला जबर मार लागला. एक महिना कोमात असणाऱ्या नीलयला वैद्यकिय उपचारामुळे शुध्द तर आली परंतु स्मृती हरवली. शिवाय हातपाय देखील अपघातामुळे वाकडे झाले. मात्र मुलावर चांगले उपचार व्हावे यासाठी अनगोळकर दांपत्यानी प्रयत्न केले. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर या शहरातून मुलावर उपचार घेत ते रत्नागिरीत दाखल झाले. उत्कृष्ट गिटार व तबला वादन करणारा व अभ्यासात प्रचंड हुशार असणाऱ्या नीलयची स्मृती अधेमधे हरवत असे. डॉक्टरांचे मत होते की, तो पूर्ण बरा होईल परंतु त्याला वेळ लागेल. हातात पेनसुध्दा धरता येत नव्हते. अशावेळी त्याला वैद्यकीय उपचाराबरोबर कौन्सिलींग तसेच काही व्हिडीओ गेमव्दारे प्रशिक्षण देण्यात येत होतं. वर्षभरात तो काहीअंशी बरा झाला मात्र सातवीत तो नापास झाला. बरोबरीची सर्व मुले पुढच्या वर्गात आपण मात्र मागच्या वर्गात हे शल्य सारखं टोचत असल्याने नीलय कणकवलीत राहण्यास तयार नव्हता. परिणामी आई वडिलांनी कणकवली सोडून नाशिक व नंतर रत्नागिरी गाठली. जीजीपीएस शाळेत प्रवेश घेतला. नीलयचा अधूनमधून स्मृती हरवण्याचा प्रकार सुरूच होता. परंतु शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण तसेच शिक्षकवर्गाचे वेळोवेळी मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे नीलय दहावीची परीक्षा पास झाला. वर्गात सोडणे, वर्गातून आणणे दिवसभरात शाळेच्या प्रांगणात थांबून वेळेवर औषधे देणे, यासाठी नीलयची आई धडपडत असे.आठवी व नववीची परीक्षा पास झालेनंतर दहावीच्या वर्गात प्रवेश घेतला. मध्येच नीलयला निमोनिया झाला, पडल्यामुळे हात पाय फॅक्चर झाले. परंतु आई स्मिता यांनी न डगमगता नीलयची सुश्रूषा सुरू ठेवली. बरा झालेनंतर पुन्हा नीलय शाळेत आल्यावर शिक्षकवृंदानी त्याचेवर प्रचंड मेहनत घेतली. स्मृती हरवण्याचा प्रकार सुरूच असल्याने शिक्षकांनी निम्मे विषय घेवून आॅक्टोबरला व निम्मे विषय घेवून मार्च मध्ये परीक्षेस नीलय याला बसविण्याचा निर्णय घेतला. त्या पध्दतीने अभ्यास घेणे सुरू ठेवले. याच दरम्यान डॉ. कृष्णा पेवेकर यांनीही निलयचे कौन्सिलींग सुरू ठेवले होते. त्यामुळे आॅक्टोबर मध्ये निम्म्या विषयाची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाल्यानंतर शिक्षकवृंदास आनंद झाला. त्यामुळे उर्वरित विषयासाठी मार्चमध्ये नीलयने परीक्षा दिली. त्यातही तो यशस्वी झाला. जीजीपीएस शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांनी हुशार मुले पास होतात. त्यांचेवर फार कमी मेहनत घ्यावी लागते. मात्र जे विद्यार्थी हुशार आहेत, मात्र एखादे अडचणीत असतील किंवा सामान्य बुध्दीमत्तेचे त्यांचेवर मेहनत घेणे हेच आम्हा शिक्षकवृंदाचे कौशल्य असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. आई होण्याचे कर्तव्य पूर्ण केले मात्र यश नीलयचे आहे. रत्नागिरीत आल्यानंतर जीजीपीएसचे मुख्याध्यापक चव्हाण व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास व माझे पाल्यावर घेतलेली मेहनत याबाबत त्यांचे कौतुक करावे, तितके थोडे असल्याचे स्मिता यांनी सांगितले.