शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला ८५ टक्के खतपुरवठा

By admin | Updated: April 20, 2016 22:26 IST

कृषी खाते : उर्वरित खत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार

रत्नागिरी : जिल्ह्यात भातशेती प्रामुख्याने केली जात असल्याने खरीप हंगामासाठी कृषी खात्याने २० हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती. मात्र, मागणीत एक हजाराची घट झाली असून, १९ हजार मेट्रीक टन खत मंजूर झाले आहे. शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी खात्याने एक हजार मेट्रीक टन जादा खत पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. जिल्ह््यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात येते. जिल्ह्यासाठी पेरणीकरिता ७ हजार २५.९५ क्विंटल भात मंजूर झाले आहे. संकरित बियाण्यांमध्ये ८८६.०४ क्विंटल व सुधारित प्रकारचे ६१३९ क्विंटल भात उपलब्ध होणार आहे. गतवर्षी जिल्ह््याला ४३६३.९५ क्विंटल भात उपलब्ध झाले होते. गतवर्षीपेक्षा यावर्षी बियाणांसाठी अधिकची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्याला मंजुरी देखील मिळाली आहे. रोहिणी नक्षत्रापासून काही ठिकाणी भातपेरणी करण्यात येते. धूळवाफेच्या पेरण्या प्राधान्याने केल्या जातात. उर्वरित पेरण्या या मृग नक्षत्रात होतात. एकूणच पर्जन्यमानावर पेरण्यांची स्थिती अवलंबून असते. मात्र, शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी कृषी खात्याने आधीच मागणी केली असून, बियाणे व खतांचे आवंटन मजूर झाले आहे. मे महिन्यात बियाणे व खते ही कृषी विभागाकडे उपलब्ध होणार असून, तातडीने खरेदी-विक्री संघामार्फत शेतकऱ्यांपर्यंत वितरीत केली जाणार आहेत. जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. तर जिल्ह्यातील ९१ हजार ५३० हेक्टर क्षेत्रावर काजूची लागवड करण्यात आली आहे. यातील ८३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम आहे. नारळ व अन्य बागायतींसाठीही खते वापरण्यात येतात. भात पेरणीनंतर उगवणीपर्यंत अवधी शिल्लक राहत असल्याने बागायतींना खते घालण्याचे काम सुरू होते. त्यामुळे दरवर्षी कृषी खाते खते उपलब्ध करून देत आहे. यावर्षीच्या खरीप हंगामासाठी युरिया १० हजार ८००, डीएपी ३००, एमओपी ४००, एसएसपी खत ८०० मेट्रीक टन मंजूर झाले आहे. उर्वरित सहा हजार मेट्रीक टन खते विविध मिश्र स्वरूपाची आहेत. गतवर्षी जिल्ह््याला युरिया खत १२ हजार ६०१.५४ मेट्रीक टन इतके मंजूर झाले होते. यावर्षी १० हजार ८०० मेट्रीक टन इतकेच मंजूर झाले आहे. युरियाचा सर्वाधिक वापर जिल्ह्यातील शेतकरी करतात. परंतु, मंजूर युरिया खतामध्ये चक्क २ हजाराची घट आहे. गतवर्षीप्रमाणे व मागणीनुसार जिल्ह्याला २० हजार मेट्रीक टन खताचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी कृषी खात्यातर्फे करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा खताचा समाधानकारक पुरवठा होईल, असा जिल्हा प्रशासनाला विश्वास आहे. (प्रतिनिधी) कृषी विभागाला विश्वास : यंदा समाधानकारक खतपुरवठा होणार गेल्या वर्षीपेक्षा यंदा बियाण्यांची मागणी जास्त करण्यात आली असून, त्याला मंजुरीही मिळाल्याने खताचीही जादा मागणी नोंदवण्यात आली आहे. मे महिन्यात हे खत कृषी विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर तत्काळ खरेदी-विक्री संघाकडे दिले जाणार आहे. त्यानंतर त्या-त्या गावी ते रवाना होणार आहे. यंदा पुरेसा खत पुरवठा उपलब्ध होईल, असा विश्वास कृषी विभागाला आहे.