शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

कचरा गोळा करण्यासाठी ३८ हजार कुंड्या

By admin | Updated: March 14, 2016 00:02 IST

चिपळूण नगरपरिषद : जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर केलेला प्रस्ताव मान्यतेविना

चिपळूण : स्वच्छ भारत अभियानअंतर्गत शहरातील ओला व सुका कचरा वर्गीकृत करून गोळा करण्यासाठी ३८ हजार प्लास्टिक कचराकुंड्या खरेदी केल्या जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे सादर करण्यात आला होता. परंतु, या प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने नगर परिषद फंडातून सुमारे ८० लाख रुपये खर्च करून कुंड्या खरेदी करण्यात येणार आहेत. यावर होणाऱ्या सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब होणार आहे.चिपळूण नगर परिषदेची सर्वसाधारण सभा १४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रावणशेठ दळी सभागृहात नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या सभेत विविध ३३ विषय ठेवण्यात आले आहेत. भाजी मंडई आरक्षण क्र. ४० मध्ये काही भाजी व्यापाऱ्यांनी ओटे भाडेतत्त्वावर घेण्याबाबत नगर परिषदेकडे अर्ज केला आहे. हे ओटे तीन वर्षांच्या भाडेकरारावर दिले जाणार आहेत. यासाठी आलेल्या अर्जांवर सभेत चर्चा केली जाणार आहे. नगरपरिषद फंडातून सुरू असलेल्या कामांवर सुपरव्हिजन करण्यासाठी आर्किटेक्ट आगरकर यांना काम देण्यात आले होते. परंतु, २४ फेब्रुवारी रोजी त्यांनी नगरपरिषद प्रशासनाला पत्र देऊन यापुढे आपण कोणत्याही नगर परिषदेच्या कामावर सुपरव्हिजन करणार नाही व केलेल्या कामाची बिले नगरपरिषदेला दान करीत आहे, असे कळवण्यात आले असल्याने याबाबत नवीन आर्किटेक्ट नेमला जाणार आहे. कांबळे असोसिएट्सने कामाच्या सुपर व्हिजनसाठी नगर परिषद प्रशासनाकडे ५.४७ टक्के कमी दराने काम करण्यास सहमती दर्शविली आहे. याबाबत या सभेत चर्चा होणार आहे. मात्र, हा विषय गाजण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद हद्दीतील मटण मार्केट कॉर्नर ते नदीपर्यंत आरसीसी गटार व नाल्यावर स्लॅब टाकण्याचे काम ठेकेदार साई कन्ट्रक्शनला देण्यात आले होते. ठेकेदाराने ८० टक्के काम पूर्ण केले आहे, परंतु या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण झाल्याने उर्वरित कामासाठी मुदतवाढ मागितली आहे. या ठेकेदाराला मुदतवाढ मिळणार अथवा कसे, यावरही चर्चा रंगणार आहे. प्रभाग क्र. २ राधाकृष्णनगर येथील वांगडे बिल्डिंग मच्छीमार्केट येथे आरसीसी गटार बांधण्यासाठी अंदाजपत्रकीय १० लाख ३२ हजार ४५२ खर्चाला आर्थिक मंजुरी दिली जाणार आहे. (वार्ताहर)