शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण तालुक्यात ३०६ शस्त्रक्रिया

By admin | Updated: September 4, 2014 00:04 IST

कुटुंब कल्याण कार्यक्रम : स्त्रियांचे प्रमाण सर्वांत जास्त तर पुरुषांचे प्रमाण नगण्य

अडरे : लोकसंख्या कमी करण्यासाठी व वाढत्या लोकसंख्येवर आळा बसावा यासाठी शासनाने कुटुंब कल्याण नियोजन सुरु केले. गेल्या चार महिन्यात कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत एकूण ३०६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण ३०० व पुरुषांचे ६ शस्त्रक्रिया केल्या आहेत. दोन मुलांवर २०६ तर दोन मुलींवर ४ जणांनी शस्त्रक्रिया करुन घेतल्या आहेत. शासनाच्या आरोग्य विभागाने कुटुंब कल्याण कार्यक्रम सुलभ व्हावा यासाठी जनजागृती केली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत अनेक सोयीसुविधाबरोबरच गरोदर माता व महिलांना व नवजात शिशुंना उपलब्ध करुन दिल्या आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुटुंब संख्या नियंत्रित करुन वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी शासनाचा प्रयत्न असतो. हा कार्यक्रम तालुक्यातील प्राथमिक केंद्राअंतर्गत घेतला जातो. चिपळूण तालुक्याला यावर्षी १ हजार ३१९ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यापैकी जुलै अखेरपर्यंत ३०६ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. चिपळूण तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत कुटुंब कल्याण झालेल्या शस्त्रक्रिया त्यामध्ये रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला १५६ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ३८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. कापरे अंतर्गत ११३ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी २३ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. खरवते केंद्राला १३३ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ६२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दादर अंतर्गत १३७ चे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी २८ शस्त्रक्रिया झाल्या. शिरगांव अंतर्गत १४७ चे उद्दिष्ट होते. यापैकी ३६ शस्त्रक्रिया झाल्या. अडरे अंतर्गत १९१ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३० शस्त्रक्रिया झाल्या. सावर्डे अंतर्गत १९९ चे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४० शस्त्रक्रिया झाल्या. फुरुस प्राथमिक आरोग्य केंद्राला दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. त्या केंद्राला १०१ चे उद्दिष्ट होते. त्या उद्दिष्टापेक्षा जास्त ११४ शस्त्रक्रिया करुन आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. वहाळ १४२ चे उद्दिष्ट होते. ३५ शस्त्रक्रिया केल्या आहेत. आरोग्य विभागाने विविध साथींच्या आजाराबाबत जनजागृती करण्याबरोबरच कुटुंब कल्याणचेदेखील ग्रामीण भागामध्ये जनजागृती केली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला आळा बसत आहे. (वार्ताहर)