शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

‘करमणुकी’तून ३ कोटी

By admin | Updated: January 30, 2015 23:13 IST

सर्वाधिक वसुली लांजात : मार्चअखेर उद्दिष्टपूर्ती होणार

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने डिसेंबरअखेर ७३.६४ टक्के इतके उद्दिष्ट साध्य करीत जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत २ कोटी ९१ लाखाचा महसूल जमा केला आहे. आतापर्यंत सर्वाधिक वसुली लांजा तालुक्याने (८५.८८ टक्के) केली असून मंडणगड तालुक्याची वसुली (२९.७१ टक्के) सर्वांत कमी आहे चित्रपटगृह, व्हिडीओ खेळघर, सायबर कॅफे तसेच डीटीएचधारकांकडून मिळणाऱ्या करापोटी जिल्हा करमणूक कर शाखेला महसूल मिळत असतो. २०१४ - १५ या आर्थिक वर्षाकरिता करमणूक शाखेला ३ कोटी ९५ लाख रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी डिसेंबरअखेर २ कोटी ९० लाख ८६ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. यात लांजा तालुका अग्रेसर आहे. त्यापाठोपाठ दापोली व संगमेश्वर हे तालुके अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी आहेत. गतवर्षी या शाखेने मार्चअखेर उद्दिष्टापेक्षा अधिक महसूल मिळविला होता. मात्र, यावर्षी जिल्ह्यात एप्रिलमध्ये लोकसभा झाल्या. या निवडणुकीची धामधुम संपते न संपतो तोच पाठोपाठ अवघ्या चारच महिन्यांनी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले. या दोन्ही निवडणुकांच्या प्रक्रियेत अधिकारी तसेच कर्मचारीवर्ग अडकल्याने वसुलीत खंड पडला. मात्र, त्यानंतर आता या शाखेने वसुलीची जोरदार मोहीम उघडली आहे.जिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्या कमी झाली आहे. टी. व्ही, कॉम्प्युटर याचा फटका व्हिडीओ खेळघर, सायबर कॅफे यांना चांगलाच बसला असल्याने त्यांचीही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे यापासून करमणूक कर शाखेला मिळणारा महसूलही कमी झाला आहे. मात्र, सध्या डीटीएचधारकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने डीटीएच करापोटी १ कोटी ९४ लाख २६ हजार इतका महसूल गोळा झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे मार्च २०१५ पर्यंत उद्दिष्टपूर्ती १०० टक्के होईल, असा विश्वास सहायक करमणूक कर अधिकारी रवींद्र खानविलकर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)डीटीएचधारक वाढल्याने महसूल वाढलाजिल्ह्यात चित्रपटगृहांची संख्या कमी झाली आहे. व्हिडीओ खेळघर आणि सायबर कॅफेनांही टी. व्ही., संगणक, मोबाईल यांचा फटका चांगलाच बसल्याने काही यापैकी काही बंद झाले आहेत. त्यामुळे यापासून मिळणारा महसूल कमी झाला आहे. मात्र, डीटीएचधारक वाढल्याने महसूल वाढला आहे.तालुकाइष्टांक वसुलीमंडणगड१.७५०.५२दापोली६४.६५ खेड२०२.२१ चिपळूण४५८.४४ गुहागर८६.२४संगमेश्वर५.०५३.९१रत्नागिरी५४.३५.८३ लांजा१.७१.४६राजापूर््५.२३.३४ एकूण१४७९६.६डिटीएच२४८१९४.२६ एकूण३९५२९०.८६