शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटी रूपयांनाच लागणार गळती ?

By admin | Updated: December 5, 2015 23:38 IST

ठिबक सिंचन योजना : अर्ज भरण्याचा कालावधी संपला

मेहरुन नाकाडे / रत्नागिरी केंद्र शासनाकडून रत्नागिरी जिल्ह्यासाठी ठिबक सिंचन योजना राबविण्याकरिता १ कोटी ९५ लाखांचे अनुदान प्राप्त झाले होते. मात्र, आॅनलाईन अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे हे अनुदान परत जाण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा म्हणून घोषित केल्यापासून फळपीक लागवडीला चालना मिळाली. जिल्ह्यात एक लाख ६२ हजार ५४७ हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड करण्यात आली आहे. डोंगरदऱ्यांमधून हे भौगोलिक क्षेत्र विखुरले आहे. लागवडीनंतर पिकांच्या वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी ठिबक सिंचन फार उपयोगी पडत आहे. जिल्ह्यात ४०० शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे. दरवर्षी ३० ते ३५ लाखांचे अनुदान ‘ठिबक’साठी वितरीत करण्यात येते. मात्र, यावर्षी केंद्र शासनाकडून भरघोस निधी जाहीर करण्यात आला. अर्ज भरण्यासाठी १ ते १५ नोव्हेंबरअखेर कालावधी निश्चित करण्यात आला होता. परंतु, दि. १० ते १५ नोव्हेंबरअखेर दिवाळीची सुटी शासकीय कार्यालयांना होती. उर्वरित नऊ दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. दिवाळीनंतर कृषी विभागाकडे २५ अर्ज शेतकऱ्यांनी ठिबकसाठी पाठवले आहेत. मात्र, संबंधित शेतकऱ्यांनी हे अर्ज उशिरा पाठवल्यामुळे ते या अनुदानापासून वंचित राहणार आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ठिबक योजना आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. ठिबक योजनेकरिता अनुसूचित जाती जमातीसाठी ४५ टक्के, तर खुल्या गटासाठी ३५ टक्के अनुदान शासनाकडून देण्यात येते. बदलत्या हवामानामुळे कलमे जगवण्यासाठी शेतकरी ठिबकचा वापर करू लागले आहेत. परंतु, चुकीच्या वेळेत शासनाकडून अर्ज पाठवण्याचा कालावधी जाहीर करण्यात आल्याने आलेला निधी परत जाणार आहे. वास्तविक यावर्षी नोव्हेंबरअखेर भातकापणी सुरू होती. कापणीच्या कामात शेतकरी व्यस्त असल्यामुळे ठिबकचे आॅनलाईन अर्ज शेतकरी भरू शकले नाहीत. आर्थिक वर्ष मार्चमध्ये संपत असल्यामुळे हा निधी परत जाणार आहे. गेली चार वर्षे कोकणातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे आर्थिक संकटांचा मुकाबला करत आहेत. यावर्षीसुध्दा अद्याप थंडी नसल्यामुळे मोहोर प्रक्रिया सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकरी धास्तावलेला आहे. कोकणातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदत जाहीर करण्याची मागणी येथील शेतकरीवर्गातून होत आहे. (प्रतिनिधी) अर्ज पडून : कोकणासाठी अट शिथिल करण्याची मागणी शासनाकडून कोणत्याही योजनेसाठी सरसकट कालावधी निश्चित केला जातो. मात्र, कोकणातील बदलते हवामान व भौगोलिक क्षेत्र विचारात घेता कोकणासाठी सरसकट कालावधी निश्चित करण्याची अट शिथिल करून विशिष्ट कालावधी जाहीर करावा. सध्या कृषी विभागाकडे २५ अर्ज शेतकऱ्यांचे पडून आहे. आर्थिक वर्ष समाप्तीपूर्वी पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी कालावधी निश्चित केला तर नक्कीच त्याचा फायदा येथील शेतकऱ्यांना होऊ शकेल. त्यामुळे हा कालावधी वाढवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.