शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

मँगोनेटमध्ये १,४६० बागायतदार

By admin | Updated: February 13, 2015 22:54 IST

निर्यात वाढणार : युरोपीय देशांनी आंबा आयातीवरील बंदी उठवली...

रत्नागिरी : फळमाशीचे कारण देत गतवर्षी युरोपीय देशांनी आंबा नाकारला होता. मात्र, काही अटी शिथील करून युरोपीय देशांनी यावर्षी आंबा आयातीवरील बंदी उठविली आहे. मात्र, शेतकऱ्यांना आंबा परदेशात निर्यात करण्यासाठी कृषी विभागातर्फे मँगोनेटव्दारे नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील १४६० शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. आंबा बागेचा सातबारा व जागेचा नकाशा याव्दारे आॅनलाईन अर्ज भरून मँगोनेटची नोंदणी करण्यात आली आहे. मँगोनेटसाठी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी दि. २० फेब्रुवारी रोजी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. यावेळी परदेशात आंबा आयात करणाऱ्या व्यापाऱ्यांना बोलावण्यात येणार असून, ते मार्गदर्शन करणार आहेत. मँगोनेटची प्रक्रिया कशी असते, बागेची पाहणी झाल्यानंतर फळांचे वर्गीकरण तसेच बागेसाठी वापरण्यात आलेली खते, कीटकनाशके यांची नोंदणी कशा पद्धतीने करावी, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यामध्ये २८ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मँगोनेटसाठी नोंदणी केलेल्या बागेची तपासणी करुन अहवाल तयार करण्यात येणार आहे. संबंधित अहवाल तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना मँगोनेटचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. मँगोनेटकडे शेतकऱ्यांचा सध्या वाढता कल असून, दिवसेंदिवस बागांचे क्षेत्र वाढत आहे.युरोपीय देशांमध्ये आंबा पाठवत असताना त्यावर उष्णजल प्रक्रियाही करण्यात येणार आहे. आंब्यावर एक तास ४८ अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीच्या अळ्या मरून जातात. बैगनपल्ली, बदामी, तोतापुरी, केशर यांसारख्या जातीच्या आंब्याची साल जाड असल्याने या आंब्यासाठी संबंधित प्रक्रिया योग्य आहे.मात्र, हापूस आंब्याची साल पातळ असल्याने संबंधित प्रक्रियेमुळे हापूसच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वास्तविक आंब्यावर १५ एप्रिलनंतर फळमाशीचा प्रादुर्भाव होतो. यासंबंधी तातडीने अहवाल पाठविणे गरजेचे असल्याने विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरू करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)युरोपीय देशांनी आंबा आयातीवरील बंदी उठवल्याने बागायतदारांना त्याचा फायदा झाला आहे. निर्यातीसाठी यामुळे अनुकूल वातावरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे.