शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी यावर्षी १२ लाखांचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

टेंभ्ये : प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने यावर्षी बारा लाख अर्जांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या ...

टेंभ्ये : प्रीमॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेसाठी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाने यावर्षी बारा लाख अर्जांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाच्या सूचनांना अनुसरून संचालक तुकाराम सुपे यांनी सर्व शिक्षणाधिकारी व शाळांसाठी परिपत्रक व प्रसिद्धीपत्रक दिले आहे.

धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पहिली ते दहावी या वर्गातील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना सुरु झाली आहे. चालूवर्षी NSP २.० पोर्टलवर नवीन व नूतनीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची सुरुवात दि. १८ ऑगस्टपासून झाली आहे. नवीन व नूतनीकरण केलेल्या विद्यार्थ्याने शाळेमार्फत अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२१ आहे. शाळास्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख १५ डिसेंबर २०२१ असून, जिल्हास्तरावर अर्ज पडताळणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२१ आहे.

पहिली ते दहावीच्या सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शासकीय, निमशासकीय, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शासन मान्यताप्राप्त शाळांमधून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना आहे. विद्यार्थी शिकत असलेल्या शाळांच्या वसतिगृहात राहात असतील अथवा राज्य शासनाच्या वसतिगृहात राहात असतील केवळ तेच विद्यार्थी या योजनेत वसतिगृहाचे विद्यार्थी म्हणून गणले जातात. तसेच वसतिगृहामध्ये भरलेल्या शुल्काच्या पावत्या शाळेच्या मुख्याध्यापकांना सादर करणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

------------------------------

सन २०१५-१६पासून शिष्यवृत्तीचे वितरण केंद्र शासनातर्फे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहे. सन २०२०-२१ मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या, शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी सन २०२१-२२करिता नूतनीकरण विद्यार्थी म्हणून ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल.

-------------------------

मागील वर्षी नवीन व नूतनीकरण मिळून एकूण साडेअकरा लाख अर्ज प्राप्त झाले होते. चालूवर्षी नवीन पाच लाख व नूतनीकरणाचे सात लाख असे एकूण बारा लाख अर्ज नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सक्षम अधिकाऱ्याचे (तहसीलदार किंवा तत्सम) उत्पन्नाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.

- राजेश क्षीरसागर, राज्य उपसंचालक, प्रौढ व अल्पसंख्याक शिक्षण.