शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 23:34 IST

समाज कल्याण दिलीप भोईर, महिला बाल कल्याण गीता जाधव यांच्याकडे

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन सभापतिपदे मिळाली. शेकापचे दिलीप भोईर यांची समाजकल्याण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांची महिला बालकल्याण सभापतिपदी तर अन्य दोन विषय समिती सभापतिपदी अनुक्रमे शेकापच्या अ‍ॅड. नीलिमा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन मनवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी जाहीर केले. नीलिमा पाटील आणि बबन मनवे यांना कोणत्या विषय समितीचा कारभार पाहवा लागणार याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

जिल्हा परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात विषय समितीच्या सभापतिपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. या प्रसंगी शिवसेना आणि भाजपचे सदस्य गैरहजर असल्याचे दिसून आले. शेकापकडून दिलीप भोईर यांनी समाजकल्याण सभापतिपदासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांनी महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली. अन्य दोन विषय समितिपदासाठी शेकापच्या अ‍ॅड. नीलिमा पाटील, राष्ट्रवादीचे बबन मनवे यांचीही बिनविरोध निवड झाली.

विषय समिती सभापतिपदाच्या आजच्या निवडीकडे शिवसेनेसह भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवल्याने चारही सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अर्थ आणि बांधकाम सभापतिपदासाठी शेकापच्या अ‍ॅड. नीलिमा पाटील या इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते.समाज कल्याण, महिला व बालकल्याण सभापतिपद अनुक्रमे शेकाप, राष्ट्रवादीकडे गेले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे हे कोणत्याही एका विषय समितीचे सभापती असतात. अद्याप शिक्षण व आरोग्य, कृषी व पशू संवर्धन आणि अर्थ व बांधकाम या तीन विषय समित्यांवर सभापती विराजमान झालेले नाहीत.