शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘झाप’ व्यवसायावर मंदीचे सावट

By admin | Updated: March 29, 2017 05:10 IST

रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील परिसर हा निसर्गरम्य नारळी-पोफळीच्या बागांनी

बोर्ली-मांडला/मुरुड : रायगड जिल्ह्यातील मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील परिसर हा निसर्गरम्य नारळी-पोफळीच्या बागांनी नटलेला आहे. वाऱ्यावर डोलणाऱ्या नारळी-पोफळीच्या बागा हे या ठिकाणचे वैशिष्ट्य होय. मात्र वृक्षाच्या झावळीपासून झाप तयार करण्याच्या व्यवसायावर प्लॅस्टिकच्या ताडपत्रीमुळे मंदी आली आहे. प्लॅस्टिकचा सर्वत्र वाढलेला वापर प्रमुख कारण आहे.प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे पर्यावरणाला असलेला धोका लक्षात घेऊन विविध शहरात प्लास्टिक हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. कारण या प्लॅस्टिकचा पर्यावरणावर परिणाम होऊन मानवी जीवनाला हानिकारक आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील नारळाच्या झाडापासून झाप विणणाऱ्या कारागिरांना बसला आहे. मुख्य करून झापाचा उपयोग उपाहारगृहे, रस गुऱ्हाळे हे व्यावसायिक करीत असत. याशिवाय शुभकार्याच्या वेळी मंडपासाठी देखील याचा उपयोग होत असे. पेंढ्याच्या राशी, पावसाळ्यातील वापरण्यात येणारा जळाऊ लाकूडफाटा आणि थेट रेवस मांडवापासून मुरु ड जंजिरापर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यावर ठेवण्यात येणाऱ्या नौका झाकण्यासाठी झापांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे. तसेच सुपारी सुकविण्यासाठी या झापाचा वापर असे. त्या ठिकाणी प्लॅस्टिक आणि ताडपत्र्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. त्यामुळे झापांचा खप कमी झाला आहे. त्यामुळे कारागीर रोजगारापासून वंचित झाले. (वार्ताहर)वृक्षाच्या झावळीपासून झाप तयार करण्याच्या व्यवसायावर  मंदी आली आहे. प्लॅस्टिकच्या ताडपत्रीच्या वापराचा फटका ग्रामीण भागातील नारळाच्या झाडापासून झाप विणणाऱ्या कारागिरांना बसत आहे.सुपारी सुकविण्यासाठी या झापाचा वापर असे. त्या ठिकाणी ताडपत्र्यांचा वापर होऊ लागला आहे. एक झाप बनविले की आम्हाला पाच रु पये मिळायचे, आम्ही दिवसाला चाळीस ते पन्नास झाप बनवत असू. मालक मात्र एका झापाची विक्र ी ही वीस ते पंचवीसप्रमाणे करीत असे. आता मात्र एका झापाची किंमत ही तीस ते पस्तीस एवढी आहे. मात्र झापाचा वापर आज काही ठरावीकच लोक करीत आहे. - रामचंद्र आगरी, कारागीर