शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेचे काम संथ गतीने

By admin | Updated: November 23, 2015 01:28 IST

खोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात

अमोल पाटील, खालापूरखोपोली शहराची पाणी योजना रखडल्याने अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील विविध भागांमध्ये पालिकेकडून ४० टँकरने पाणीपुरवठा केला जात असून पाणी योजनेचे काम कासवगतीने सुरू असल्याने खोपोलीकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेली जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजना प्रशासनाच्या उदासीन भूमिकेमुळे ३५ कोटी रूपयांवर गेली आहे. आणखी किमान चार ते सहा महिन्यांचा कालावधी ही योजना पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे खोपोलीकरांना आणखी काही दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.खोपोली नगरपालिकेने शहरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन २००८ मध्ये जवाहरलाल नेहरू शहरी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू केले होते. ही योजना अस्तित्वात आल्यानंतर वीणानगर, अशियाना इस्टेट, काटरंग, मोगलवाडी, भानवज, वर्धमान नगर, साईबाबा नगर, शिळफाटा, हाळ, ताकई, यशवंत नगर या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार होता. शहरातील अन्य भागातही या योजनेमुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार होता. २००८ मध्ये १५ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असलेल्या या योजनेचे काम सुरू झाले. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आजही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. काम रखडल्यामुळे ही योजना पूर्ण करण्यासाठी सध्या ३५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.खोपोली शहरात अनेक भागांमध्ये पाणीच येत नसल्याने पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासाठी ४० टँकर वापरले जात असल्याची माहिती उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती रमेश जाधव यांनी दिली आहे. पालिकेकडून मुख्य जलवाहिनी टाकल्यानंतर अन्य जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. या कामासाठी आणखी किमान चार महिन्यांचा अवधी लागण्याची शक्यता आहे. पालिकेकडून मात्र हे काम लवकर होईल असे सांगितले जात आहे.