शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

चुलीच्या धुरापासून होणार महिलांची सुटका

By admin | Updated: July 25, 2016 03:06 IST

गरीब महिलांच्या घरातील चुली एलपीजीच्या माध्यमातून पेटविण्यासाठी केंद्र सरकारने वितरक कंपन्यांमार्फ त एजन्सींना चांगलेच कामाला लावले आहे

आविष्कार देसाई,  अलिबागगरीब महिलांच्या घरातील चुली एलपीजीच्या माध्यमातून पेटविण्यासाठी केंद्र सरकारने वितरक कंपन्यांमार्फ त एजन्सींना चांगलेच कामाला लावले आहे. जिल्ह्यातील गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या २१ एजन्सींना दारिद्र्यरेषेखालील सुमारे ८० हजार लाभार्थ्यांना नवीन एलपीजी कनेक्शन्स द्यावी लागणार आहेत. दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांंचा शोध घेताना मात्र एजन्सींना चांगलीच मेहनत घ्यावी लागत आहे.ग्रामीण भागातील गरीब महिला अद्यापही चुलींवर स्वयंपाक बनवितात. चुलीसाठी इंधन म्हणून लाकूड, कोळसा, सरपण यांचा सर्रास वापर केला जातो. या माध्यमातून चुली पेटविल्यामुळे त्यामधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे महिला आणि लहान मुलांच्या आरोग्यावर प्रचंड विपरीत परिणाम होतो. त्याचप्रमाणे डोळ्यांवरही परिणाम होतो. या सर्वांतून महिला आणि मुलांची सुटका करून त्यांना स्वच्छ इंधन देण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजना आखली आहे. या योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील महिलांना नवीन एलपीजी कनेक्शन मोफत देण्यात येत आहेत. सिलिंडर सुरक्षा ठेव, डीपीआर सुरक्षा ठेव, निरीक्षण, स्थापना, प्रदर्शन, दस्तऐवज यासह अन्य बाबींसाठी केंद्र सरकार एक हजार ९९५ रु पये आपल्या पदरचे देणार आहे. त्याचप्रमाणे प्रथम रिफिल सिलिंडरसाठी आणि बर्नरच्या शेगडीसाठीही संबंधित कंपन्यांमार्फत एक हजार ५५१ रु पयांचे कर्ज देणार आहे. या कर्जाची परतफेड ही संबंधित लाभार्थ्यांच्या सबसडीतून वसूल करण्यात येणार आहे. कर्जाची रक्कम वसूल झाल्यावर सबसिडी पूर्ववत सुरू होणार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ८० हजार दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांची संख्या आहे. २०११ च्या सामाजिक आणि आर्थिक जनगणनेनुसार लाभार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. संबंधित एजन्सींना अशा लाभार्थ्यांचा शोध घ्यायचा आहे. त्यांच्यापर्यंत पोचून त्याला या योजनेत समाविष्ठ करून घ्यायचे आहे. केंद्र सरकारची ही योजना असल्यामुळे गॅसपुरवठा कंपन्यांनी त्यांच्याकडील एजन्सींना कामाला लावले आहे. केंद्र सरकारचे थेट नियंत्रण असल्यामुळे राज्य सरकारची कोणतीही सरकारी यंत्रणा यामध्ये समाविष्ठ नसल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी एल. एम. दुफारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.