शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारी निवारणासाठी व्हॉट्सअ‍ॅप उत्तम

By admin | Updated: November 30, 2015 02:24 IST

ग्रामपंचायत सूचना व तक्र ार निवारण व्हॉट्सअ‍ॅप नंबर प्रसिध्द करणे, ग्रामपंचायत पंधरा टक्के निधीतून लाभार्थींना साहित्याचे वाटप करणे, घंटागाडी व ट्रॅक्टरट्रॉलीचे उद्घाटन करणे

मोहोपाडा : ग्रामपंचायत सूचना व तक्र ार निवारण व्हॉट्सअ‍ॅप नंबर प्रसिध्द करणे, ग्रामपंचायत पंधरा टक्के निधीतून लाभार्थींना साहित्याचे वाटप करणे, घंटागाडी व ट्रॅक्टरट्रॉलीचे उद्घाटन करणे आदी विकासकामांचे उद्घाटन आ.मनोहर भोईर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्हॉट्सअ‍ॅपव्दारे नागरिकांच्या सूचना व तक्र ार निवारण करणारी मोहोपाडा ग्रामपंचायत ही रायगडमधील पहिली ग्रामपंचायत असून ग्रामपंचायतीने नागरिकांच्या समस्या व तक्र ार निवारण करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचे माध्यम उपलब्ध करून ग्रामपंचायतीने कौतुकास्पद काम केले असल्याचे गौरवोद्गार आमदार मनोहर भोईर यांनी काढले. खालापूर तालुक्यातील मोहोपाडा ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत आहे. वाढता विस्तार पाहता परिसरातील समस्या तसेच ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढली असून या समस्या निवारण करण्यासाठी नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅप सोशल मीडियाचा चांगला फायदा होवून परिसरातील समस्या सुटण्यास मदत होईल. मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीतील घनकचऱ्यासाठी शासनाकडून जागा उपलब्ध करून देईन तसेच भेडसावणारी पाणी समस्याही लवकरच दूर करू असे आश्वासन यावेळी आमदार मनोहर भोईर यांनी बोलताना दिले. यावेळी सरपंच शशिकांत मुकादम यांनी आपल्या भाषणात ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.ग्रामपंचायतीचा विस्तार मोठा आहे. याकरिता ग्रामपंचायतीचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर ९०७५३४५३४५ हा असून नागरिकांनी या क्र मांकावर आपल्या समस्या मांडाव्यात, त्या सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल असे आवाहन सरपंच शशिकांत मुकादम यांनी केले. यावेळी सरपंच मुकादम यांनी शासनाकडून घनकचरा टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी आ.मनोहर भोईर यांच्याकडे केली.जि.प.सदस्या उमा मुंढे यांनी येथील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नवीन टॅब मिळावा यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत अशी मागणी केली. यावेळी पंचायत समिती उपसभापती श्याम साळवी, उपसरपंच सद्गुणा पाटील, सुरेश म्हात्रे, नथुराम भोईर आदी उपस्थित होते.(वार्ताहर)