शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये कोण करणार सत्ता काबीज?

By admin | Updated: November 14, 2016 04:23 IST

उमेदवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला केवळ दोन अपक्ष महिला उमेदवारांनी प्रभाग आठ ब आणि प्रभाग आठ क मधून उमेदवारी

माथेरान : उमेदवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी म्हणजे ११ नोव्हेंबरला केवळ दोन अपक्ष महिला उमेदवारांनी प्रभाग आठ ब आणि प्रभाग आठ क मधून उमेदवारी मागे घेतल्याने नगरसेवक पदांसाठी एकूण ४६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर नगराध्यक्ष पदांसाठी भाजपा १, शिवसेना १, कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीतर्फे १ आणि १ अपक्ष महिला उमेदवार सज्ज आहेत. यावेळेस ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. कारण एकाच कुटुंबातील दोन महिला नगराध्यक्ष पदांसाठी परस्पर उभ्या आहेत. येथल्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच चौरंगी लढत नागरिकांना पहावयास मिळणार असल्याने खरी रंगत शिवसेना आणि कॉँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीसोबतच होणार आहे. प्रत्येक पक्षाने नगरपरिषदेवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी रस्सीखेच सुरू केली असून या चौरंगी लढतीत स्वबळावर शिवसेना आणि भाजपा हेच पक्षाच्या अधिकृत चिन्हावर सामोरे जात आहेत.तर राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेस यांची जरी आघाडी असली तरीसुद्धा घड्याळ आणि हाताचा पंजा ही आपापली चिन्हे घेऊन दोन्ही कॉँग्रेस निवडणुकीला सज्ज झाले आहेत. दरम्यान, एकच अपक्ष उमेदवार आहे. दोन्ही बाजूंची काहीअंशी मते आपल्याच पारड्यात पाडून सत्तेच्या समीप जाणाऱ्या शिवसेना आणि दोन्ही कॉँग्रेस यांना शह देऊन काहीशा फरकानेच या निवडणुकीत काठावर पास व्हावे लागणार असून काँटे की टक्कर या निवडणुकीत सर्वच नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. सध्यातरी शिवसेनेचा जोर अधिक असला तरीसुद्धा दोन्ही कॉँग्रेस मिळून एकट्या शिवसेनेला सत्तेपासून रोखण्यासाठी कंबर कसून आहेत. शिवसेनेत नवोदित उमेदवारांचा भरणा असल्याने त्यांना सहजपणे रोखून धरू असा ठाम विश्वास जरी दोन्ही कॉँग्रेसला असला तरी मागील दोन वर्षांच्या काळात सत्तानिहाय कामांचा सपाटा शिवसेनेच्या प्रमुख मंडळींनी, कार्यकर्त्यांनी लावल्याने स्वबळावर विजयी होऊ असा विश्वास आहे.