शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

पेणमध्ये शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत

By admin | Updated: June 8, 2015 04:22 IST

शेकापतर्फे रायगडावर छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन शेकाप आमदार धैर्यशील पाटील व ५०० कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

पेण : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षातर्फे रायगडावर छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन शेकाप आमदार धैर्यशील पाटील व ५०० कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोल्हापूर संस्थानचे युवराज शंभूराजे यांच्या हस्ते प्रज्वलित केलेली शिवज्योत मशाल थेट रायगडावरून पेण येथे २०५ किमीचा पायी प्रवास करीत या शिवज्योत पदभ्रमण यात्रेचे पेण शहरात जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थित राहून शिवज्योतीचे पेण शिवाजी चौकात सांगता केली.शेतकरी कामगार पक्षातर्फे पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. छत्रपतींना साऱ्या समाजाकडून मानवंदना देण्यात येते. यावर्षी शेकाप महिला संचालित मैत्रेय ग्रुपने शिवजयंती साजरी करून नवी संकल्पना राबविली होती. त्यापाठोपाठ पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ही शिवज्योत प्रेरणा रॅलीचा कार्यक्रम राबवून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरणनिर्मिती केली. थेट रायगड ते पेण या प्रवासात महाड, माणगाव, इंदापूर, कोलाडनाका, वाकणफाटा, नागोठणा, वडखळ या ठिकाणी पक्ष कार्यकर्ते व नेतेगणांनी त्या-त्या ठिकाणी शिवज्योतीचे उत्साहात स्वागत केले. पेण शहरात रायगड बाजार ते शिवाजी चौक या ५०० मीटर अंतरावर शेकापच्या पेण तालुका व शहरातील तब्बल २००० कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढीत या शिवज्योतीचे स्वागत केले. या मिरवणुकीत आमदार जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, आरडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, शेकाप रोहा चिटणीस राजा सानप आदींनी सहभाग घेतला. पेणच्या शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याजवळ या शिवज्योत यात्रेची सांगता शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील व माजी आमदार विवेक पाटील यांनी केली. (वार्ताहर)