शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो

By admin | Updated: November 16, 2016 04:39 IST

राज्य आणि केंद्र सरकारकडे भरपूर पैसा आहे. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. मुंबई-अलिबाग ‘फास्ट मोटर ट्रान्सपोर्ट’

अलिबाग : राज्य आणि केंद्र सरकारकडे भरपूर पैसा आहे. विकास शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन आहे. मुंबई-अलिबाग ‘फास्ट मोटर ट्रान्सपोर्ट’ सुविधा देण्यात येत आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो आहोत. पण त्याच वेळी कोणीही कितीही गुन्हे लपवण्याचा प्रयत्न केला तरी सरकार त्यांना पाठीशी घालणार नाही, असा जाहीर इशारा रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी मंगळवारी येथे बोलताना दिला.अलिबाग नगरपरिषदेतील गेल्या ३० वर्षांपासून सत्ताधारी असलेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून अलिबाग न.पा.ची सत्ता ताब्यात घेण्याकरिता भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि मनसे अशा चार पक्षांनी एकत्र येवून स्थापन केलेल्या अलिबाग शहर संघर्ष समितीचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर मधुकर ठाकूर व नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत पालकमंत्री मेहता बोलत होते.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेस नेते माजी आमदार मधुकर ठाकूर, अलिबाग शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड.सागर पाटील, भाजपाचे अ‍ॅड.महेश मोहिते, समितीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर मधुकर ठाकूर व सर्व नगरसेवकपदाचे उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.पालकमंत्री मेहता म्हणाले की, इतिहास आणि शौर्याची परंपरा असलेल्या अलिबाग शहरात आठवड्याला दोन लाख पर्यटक येतात परंतु त्यांना साधी सुविधा नाही. जिल्ह्याच्या राजधानीचे हे शहर पण गेल्या ३० वर्षांपासून सत्ता असलेल्या शेकापकडे जनतेप्रति कटिबद्धता नसल्याने येथे विकास झाला नाही. विकासाच्या मुद्द्यावर अलिबागच्या नागरिकांनी दिलेल्या संकेतानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सर्व उमेदवारांना येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान करुन अलिबागकर नागरिक निवडून देतील याची खात्री आहे. मी कुठेही असलो तरी सतत अलिबाग शहर संघर्ष समितीबरोबरच असेन आणि अलिबाग शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहीन, असे मेहता यांनी सांगितले.यंदाच्या निवडणुकीत शेकापमुक्त अलिबाग ही घोषणा असल्याचे यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले तर निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी आमदार मधुकर ठाकूर यांनी दिली. (विशेष प्रतिनिधी)