शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची ३० काेटींची याेजना रखडली; धरणात पाणीसाठा असूनही वापर नाहीच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 01:31 IST

पेण तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजना

दत्ता म्हात्रेपेण: तालुक्यातील शहापाडा प्राधिकरण योजनेतील ३० काेटी रुपयांची पाणी पुरवठा याेजना रखडली आहे. गेल्या चार वर्षांपासून २७ गावे आणि ४३ वाड्या या पाण्यावाचून वंचित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. प्राधिकरणाकडून काम पूर्ण हाेत नसेल तर मिलिटरीकडून हे काम करावे, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत.

हेटवणे धरणात  विपुल प्रमाणात पाणीसाठा आहे. मात्र त्या पाण्याचा एक थेंबभरही वापर या विभागातील ग्रामस्थांसाठी हाेत नसल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ही  याेजना मुदतीत पूर्ण करत नसल्याने दिसते आहे.

वाशी, वडखळ विभागाची पाणीटंचाई समस्या कायमची निकाली काढण्यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याचे बाेलले जाते. शहापाडा प्रादेशिक दक्षिण व उत्तर योजना कालबाह्य झाली आहे. उत्तर योजनेतील गावांची तहान भागवण्यासाठी शहापाडा धरणाची क्षमता नाही. त्यासाठी हेटवणे धरणाचे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करून ते शहापाडा उत्तर योजनेतील २७ गावे ४३ वाड्यांसाठी देणे गरजेचे आहे.  एमएमआरडीएच्या माध्यमातून ३० कोटी रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम २०१६ साली सुरू झाले.  त्यामधे वाशी नाका ते वढाव गावापर्यंत आठ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे जे पाणी शहापाडा धरणात स्टोरेज करण्यासाठी आणायला हवे होते तिथं काम शून्य झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची दूरदृष्टी आणि लोकहिताचे प्राधान्यक्रमाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित हाेत आहे. ठेकेदाराची अकार्यक्षमता व त्यावर घातलेल्या पांघरुणामुळे हेटवणे धरण उशाला आणि कोरड पडली घशाला अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे बाेलले जाते. दररोज पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा अधिकाऱ्यांवर सगळेच तोंड सुख घेतात. मात्र त्यांच्या शहापाडा धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे. याकडे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार असा सवाल विचारला जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नीलिमा पाटील अध्यक्षस्थानी असताना ८० लाखाची जी योजना राबविण्यात आली होती. त्या योजनेतून सध्या पाणी पुरवठा होत आहे. मात्र तो उत्तर शहापाडा योजनेतील गावांना अपुरा पडत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या लाइनवर असलेले अनधिकृत नळ कनेक्शन यापैकी सहा नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.योजनेतील समोरच्या गावांमध्ये पाणीपुरवठा होतो, तर टोकावरची गावांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चार दिवसांनंतर पाचव्या दिवशी पाणी मिळते. त्यासाठी धावपळ करावी लागते. त्यामुळे मोर्चे, उपोषणे, आंदोलनचे सध्या पेव फुटले आहे. पेणचे भाजप आमदार तथा माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी यासाठी प्रांत अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्यासमवेत बैठक घेऊन टँकर लवकर सुरू करावेत, अशी मागणी केली. पेण तहसीलदार, गटविकास अधिकारी, जेएसडब्लू कंपनी यांच्या माध्यमातून तूर्तास पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याची सक्त ताकीद अधिकारी वर्गाला दिली आहे.