शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: March 18, 2016 00:15 IST

दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही महाड, पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी येत्या काही दिवसात

- संदीप जाधव, महाडदरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही महाड, पोलादपूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मागील वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षी येत्या काही दिवसात ही पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने टंचाई आराखडा तयार केला असून त्यानुसार महाड तालुक्यात ४९ गावे २०१ वाड्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. या दोन्ही तालुक्यातील काही दुर्गम ठिकाणच्या वाड्यांवर तर दोन दोन किमी अंतरावरुन पाणी आणण्यासाठी वणवण करावी लागत असून शहरानजिकच्या केंबुर्ली गावात तर पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे.महाड तालुक्यात नळपाणी योजनांची २१ कामे मागील वर्षी मंजूर असून त्यापैकी निम्मी कामे पूर्ण झाली आहेत तर उर्वरित कामे प्रगतिपथावर असली तरी ठेकेदार व स्थानिक ग्रामस्थांच्या वादात ही कामे रखडल्याची माहिती पुढे आली आहे. चोचिंदे गौळवाडी १५ लाख, कोंडीवते ५० लाख, कांबळे तर्फे बिरवाडी ५० लाख, आढी डोंडरवाडी १७ लाख, शिरवली ५० लाख, जीते ५० लाख, हिरकणीवाडी तलाव ३२ लाख आदी कामे सुरु असून यापैकी काही कामे स्थानिक अडचणीमुळे प्रलंबित आहेत. पोलादपूर तालुक्यात राष्ट्रीय पेयजल योजनेतून ११ कामे मंजूर असून त्यापैकी ८ कामे पूर्ण तर ३ कामे प्रगतिपथावर आहेत.धरण झाल्यास टंचाईवर मात : महाड तालुक्यात काळ नागेश्वरी तसेच कोथेरी धरणांची कामे गेल्या तीन चार वर्षांपासून रखडलेली आहेत तर पोलादपूर तालुक्यातील धारवली, कातवली धरणांचा प्रकल्प देखील अर्धवट स्थितीत आहे. हे धरण प्रकल्प पूर्ण झाल्यास दोन्ही तालुक्याची पाणीटंचाईची समस्या पूर्णपणे निकाली निघेल असे अनेकांचे मत आहे. महाड, पोलादपूर तालुक्यात दरवर्षी पाणीपुरवठा योजनांवर अक्षरश: कोट्यवधी रुपयांचा निधी शासन खर्च करते मात्र या दोन्ही तालुक्याला वर्षानुवर्षे लागलेले टंचाईचे ग्रहण सुटत नसल्याने स्थानिक प्रशासन देखील हतबल होत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठ्याचे नियोजनयंदाही टँकरग्रस्त गावे व वाड्यांची स्थिती कायम असून १५ एप्रिलपासून या दोन्ही तालुक्यात प्रस्तावित ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट के ले आहे. महाडमध्ये ताम्हाणी धनगरवाडी, कावळे धनगरवाडी, रावतळी मातेचा धार, गिझेवाडी, पांगारी धार, पाचाड, वीर मनवेकोंड, खडकवाडी, माझेरी, पारमाची, वाळसरे, पिंपळकोंड, निजामपूर, गोंडाळे, शेडगेकोंड, झांजेकोंड, किंजकोळी, नातोंडी, वाकी, कोळोसे आदी गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागणार आहे.पोलादपूर तालुक्यात बोरघर, आडावळे, पोफळ्याचा तुरा, बोरावळे चाळीचा कोंड, खांडज, किनेश्वर वाडी, गोवेले, साळवेकोंड, महादेवाचा मुरा आदींसह ९ गावे आणि ४४ वाड्यांवर दरवर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो.यंदाच्या वर्षी गतसालच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने अनेक पालिका योजनांच्या स्रोतांनी आज अक्षरश: तळ गाठलेला आहे. त्यामुळे यंदा ही पाणीटंचाईची झळ अधिक तीव्र जाणवेल अशी शक्यता आहे. टंचाईवर मात करण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. - शैलेश बुटाला, शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महाड