शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील वारे-खैरपाडा रस्त्याची दुरवस्था, कर्जत-मुरबाड राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:24 IST

वारे ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा गावाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली

संजय गायकवाडकर्जत : तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा गावाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्जत-मुरबाड राज्य महामार्गापासून खैरपाडा गावात जाण्यासाठी एकमेव असलेल्या या जोडरस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.कर्जत-मुरबाड महामार्गापासून केवळ ३०० मीटर लांबीचा हा रस्ता आहे. सुमारे २५० ते ३०० लोकसंख्या व ४५ घरांची वस्ती असलेल्या या पाड्याला मुख्यरस्त्याला जोडण्यासाठी १५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांचे काम केले होते. त्या वेळेस केवळ खडीकरण केले गेले. मात्र, त्यावर डांबरी कार्पेट न टाकल्याने काही महिन्यांत या रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खडी उखडली गेली व संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. खैरपाडा गावातील ग्रामस्थ पूर्वी शेताच्या अरुंद बांधावरून आपली रहदारी करत असत. रस्ता तयार झाल्यामुळे वाहनांची ही रहदारी सुरू झाली, गावकऱ्यांचा त्रास कमी झाला; परंतु त्या रस्त्यांची अनेक वर्षात योग्य प्रकारे देखभाल न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील खडी निघाली आहे. यामुळे रस्त्यात खड्डे पडल्याने गावकऱ्यांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील गावकरी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे मागणी करत आहेत.>आमच्या खैरपाडा रस्त्याचे दोन वेळा खडीकरण करण्यात आले; परंतु त्यावर डांबरी कारपेट टाकले नसल्याने काही दिवसांतच संपूर्ण रस्त्यात खड्डे पडले. तेव्हापासून रस्त्याची दुरुस्तीच झाली नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर रहदारी करणे ग्रामस्थांना मुश्कील झाले आहे .- नितीन शिंदे, ग्रामस्थया रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्ता खचल्याने धोकादायक अवस्थेत आहे. या संदर्भात बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी विनंती आहे.- शरद तवले, ग्रामस्थ