शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील कुपोषित बालके अनुदानाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: October 24, 2015 00:33 IST

कुपोषित मुलांसाठी सरकारने प्रतिमहा एक हजार रुपये सुरू केलेले अनुदान बंद केल्याने याचा फटका पनवेल तालुक्यातील ९० मुलांना बसण्याची शक्यता आहे. सरकारच्या नवीन

- प्रशांत शेडगे,  पनवेलकुपोषित मुलांसाठी सरकारने प्रतिमहा एक हजार रुपये सुरू केलेले अनुदान बंद केल्याने याचा फटका पनवेल तालुक्यातील ९० मुलांना बसण्याची शक्यता आहे. सरकारच्या नवीन धोरणानुसार यंदा १ आॅगस्टपासून हे अनुदान बंद करण्यात झाल्याने कुपोषित मुलांना दत्तक घेण्याकरिता ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधींकडे आशेने पाहिले जात आहे. गेली अनेक वर्षे जिजाऊ आरोग्य योजनेंतर्गत प्रत्येक जिल्हा व तालुक्यातील कुपोषित मुलांना अनुदान देण्यात येत होते. या अनुदानातून मुलाला सकस आहार तसेच औषधोपचार दिला जायचा. अनुदान आरोग्य विभागामार्फत पंचायत समितीला वर्ग करण्यात येत असे, त्यानंतर ते कुपोषित बालकांपर्यंत पोहोचवले जात असे. पण आता ही योजनाच बंद करण्यात आल्याने ग्रामीण भागात कुपोषित बालकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनुदान बंद करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यामुळे कुपोषणाचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.पनवेलमध्ये आदिवासी वाडे व पाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणी कुपोषित बालकांचे प्रमाणही जास्त आहे. पोषक आहाराचा अभाव, त्याचबरोबर गर्भावस्थेत मातेला सकस आहार मिळाला नाही तर कुपोषित बालके जन्माला येतात. अनुदान बंद झाल्याने कुपोषित बालकांच्या पोषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.रायगडमध्ये ही योजना बंद करण्यात आली नसून राज्यातच जिजाऊ महिला आरोग्य योजनेचा निधी राज्य शासनाने १ आॅगस्टपासून बंद केला आहे.या कुपोषित मुलांना ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांच्या मार्फत दत्तक तसेच अन्य योजना राबवण्यात येणार आहेत.- राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी