शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याला प्रतीक्षा सिंचनाच्या पाण्याची

By admin | Updated: November 27, 2015 02:16 IST

खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात.

पेण : खरीप हंगामाची समाप्ती झाल्यानंतर शेतकऱ्यांना वेध लागतात रब्बी हंगामाचे. रायगड जिल्ह्यात २७ लघुपाटबंधारे क्षेत्रातील तब्बल ११ हजार ६०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रब्बीची पिके घेतली जातात. रब्बी हंगाम शंभर टक्के पीक देणारा फायदेशीर हंगाम असल्याने शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पीक घेण्याची अधिक ओढ असते. या वर्षीचा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने रब्बीची मशागत करणारा शेतकरी सिंचनाच्या पाणी प्रतीक्षेत आहे. रब्बीत भातशेतीच्या बरोबरीने भाजीपाला, नगदी पिके, कडधान्य, कलिंगड व फूलशेती अशा प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर कृषी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला लघुपाटबंधारे विभाग सिंचनाचे पाणी पाटात कधी सोडणार याची प्रतीक्षा आहे. पेणमधील हेटवणे सिंचन प्रकल्पाअंतर्गत २६८ हेक्टर क्षेत्रावर धरण परिसरात रब्बी हंगामात शेती केली जाते. हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा असल्याने उन्हाळी शेतीसाठी हेटवणे धरण प्रकल्प संस्था शेतीला पाणी सोडते मात्र पाणी कधी सोडले जाणार याची तारीख सिंचन विभागे निश्चित केली नसल्याने शेतकरी चिंतेत आहे.यावर्षी हेटवणे परिसरातील रब्बी हंगामाची तयारी म्हणून शेती मशागतीची कामे करण्यासाठी शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात या परिसरातील शेतकऱ्यांना हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या डावा व उजवा तीर कालव्यातून १४ डिसेंबरपासून पाणी सोडण्यात येते, मात्र हेटवणे जलसंधारण कालवा विभागाकडून शेतकऱ्यांना या वर्षीचे शेतीसाठी पाणी सोडण्याची तारीख आजपर्यंत सिंचन विभागाने जाहीर केली नाही. या परिसरातील शासनाचे स्थानिक कोतवाल, पोलीस पाटील यांच्याकडेही शेतीसाठी पाणी सोडणार याबाबतची माहिती दिलेली नाही.हेटवणे धरणात मुबलक पाणी साठा आहे. सबंध कोकण विभागातील लघुपाटबंधारे व मध्यम प्रकल्पात ८३ टक्के पाणीसाठा आहे. सिंचनाचे पाणी शेतीला देण्यास काहीही अडचण नाही. मात्र जलसंधारण विभागाने सिंचन क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी मिळणार की नाही याबाबत सूचित केलेले नाही.