शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
5
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
6
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
7
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
8
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
9
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
11
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
12
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
13
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
14
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
15
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
16
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
17
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
18
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
19
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
20
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार ओळखपत्रांचा ‘आधार’ हरपला

By admin | Updated: October 17, 2015 02:04 IST

जिल्ह्यातील सुमारे २१ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर मतदार ओळखपत्रांना जोडला होता. मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा निवडणूक

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्यातील सुमारे २१ लाख मतदारांपैकी सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर मतदार ओळखपत्रांना जोडला होता. मात्र सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्हा निवडणूक यंत्रणेने हा कार्यक्रम आता गुंडाळला आहे. सरकारच्या ढिसाळ धोरणामुळे संपूर्ण निवडणूक यंत्रणेला वेठीस धरण्याबरोबरच मतदारांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागल्याने नाराजीचा सूर आहे.सरकारने विविध योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते. त्यामुळे मोठ्या संख्येने आधार कार्ड काढण्याच्या कामाला गती आली होती. नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे करता येणार नाही, असे आदेश काहीच दिवसांपूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सरकारची चांगलीच गोची झाली आहे. गॅस सिलिंडरच्या सबसिडीसाठी, घरकुल योजना, रेशनिंगसाठी अशा विविध योजनांसाठी आधार कार्ड सक्तीचे केले होते. मात्र आधार कार्ड नोंदणी करण्याचे काम संथगतीने सुरू होते. मतदार ओळखपत्रांना आधार कार्डचा नंबर जोडण्याचे सक्तीचे केल्याने रायगड जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने आलेल्या फतव्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तालुकास्तरावर त्यासाठी कार्यक्रमही आखले. प्रशासनाने आवाहन केल्याने त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली. रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ लाख मतदार आहेत. एवढे मोठे आवाहन प्रशासनाला पेलायचे होते. प्रशासनाने कामाला सुरुवात केली. जिल्ह्यातील सुमारे पाच लाख मतदारांनी आधार कार्डचा नंबर निवडणूक ओळखपत्राला जोडला आहे. उर्वरित १६ लाख मतदारांचा आधार नंबर मतदान ओळखपत्राला जोडण्याचा कार्यक्रम सुरू असतानाच सर्वाेच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतर आधार कार्डचा नंबर मतदान ओळखपत्रांना जोडण्याचा कार्यक्रम थांबवावा, असे आदेश सरकारने निवडणूक विभागाला दिले.