शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणात विजेच्या खांबांचा अडथळा

By admin | Updated: May 19, 2017 03:56 IST

शहरातील रस्ता रुंदीकरणात विजेचे पोल अडथळे ठरत असून त्याचा त्रास पादचारी व वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे रुंदीकरणात अडथळा ठरणारे रस्त्याच्या मधोमध

- कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : शहरातील रस्ता रुंदीकरणात विजेचे पोल अडथळे ठरत असून त्याचा त्रास पादचारी व वाहन चालकांना होत आहे. त्यामुळे रुंदीकरणात अडथळा ठरणारे रस्त्याच्या मधोमध आणि कडेला असणारे वीज खांब हटविण्याची मागणी नागरिकांडून होत आहे. नेरळ शहरात एमएमआरडी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुमारे २२ कोटी रु पयांची रस्त्याची कामे सुरू आहेत. ही कामे आरसीसी काँक्रीटीकरण करून आठ रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. काही भागात ही कामे सुरू असली तरी संथ गतीने पूर्ण होत आहेत. नेरळ बाजारपेठेतील काही रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहेत. मात्र या रस्त्यावर वीज खांब मधोमध असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या संदर्भात माहिती घेतली असता, शहरातील बाजारपेठेत भूमिगत वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहे. रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी जागा सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले. काही भागात नव्याने विजेचे खांब उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे ३५ लाख रु पयांची तरतूद आहे, परंतु हे काम अद्याप सुरू झालेले नाही. काही वीज खांबावर झाडेझुडपे वाढल्याने शॉर्टसर्किटची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्यापूर्वी ही दुरुस्ती न केल्यास अपघात होण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.रस्त्यावरील पोल हटविण्याचे काम जिल्हा परिषद करणार आहे. त्यासाठी मंजूर निधीच्या दीड टक्के निधी यासाठी वापरण्यात येणार आहे. यातील काही वीजवाहिन्या जमिनीखालून टाकण्यात येणार आहे, तर काही नव्याने पोल उभारून वीजवाहिन्या टाकण्यात येणार आहेत. - मंगेश म्हसकर, ग्रामपंचायत सदस्य, नेरळनेरळ रस्ता रु ंदीकरणात अडथळे ठरणारे विजेचे पोल नेरळ ग्रामपंचायत हटविणार आहे. एमएमआरडीएने हे काम जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्याने जिल्हा परिषद नेरळ ग्रामपंचायतीला निधी वर्ग करून विजेचे पोल हटविण्याचे काम करणार आहे.- एन. बी. शिर्के,नेरळ शाखाधिकारी, महावितरण नेरळ रस्ता रु ंदीकरणात अनेक विजेचे पोल अडथळा ठरत आहेत. त्याचा त्रास नेरळकरांना व बाजारात येणाऱ्या नागरिकांना होत आहे, तर अनेक विजेचे पोल झाडाझुडपांनी वेढले आहेत. त्याचाही त्रास मोठ्या प्रमाणात नागरिकांना होत आहे. त्यामुळे हे विजेचे पोल लवकरात लवकर हटविण्यात यावेत, अन्यथा येथे अपघात घडल्यास संबंधित ठेकेदाराला जबाबदार धरण्यात येईल. - सुमित क्षीरसागर, ग्रामस्थ, नेरळ