शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वडखळ-अलिबाग १२ मिनिटांत

By admin | Updated: October 28, 2016 03:52 IST

गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित १७०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ‘अलिबाग ते वडखळ’ या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला गती आली असून याची निविदा प्रक्रि या डिसेंबर २०१६ मध्ये

- जयंत धुळप, अलिबागगेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित १७०० कोटी रुपये अंदाजित खर्चाच्या ‘अलिबाग ते वडखळ’ या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला गती आली असून याची निविदा प्रक्रि या डिसेंबर २०१६ मध्ये सुरू होणार आहे. या महामार्गाच्या पूर्णत्वाअंती गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ ते अलिबाग हे अंतर केवळ १२ मिनिटांत कापता येणार आहे. त्यातून वेळेची मोठी बचत होणार असल्याची माहिती विधान परिषद सदस्य आमदार जयंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. ‘अलिबाग ते वडखळ’ या चौपदरी महामार्ग प्रकल्पाला गती देण्याच्या हेतूने आ.जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे विशेष बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार गडकरी यांनी बुधवारी दिल्लीत या बैठकीचे आयोजन केले होते. आ. पाटील यांनी मांडलेल्या विविध मुद्यांवर विचार विनिमय होवून महत्त्वाचे निर्णय या बैठकीत गडकरी यांनी घेतले. येत्या ७ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक आढावा बैठक याच संदर्भात बोलावण्यात आली असून त्यानंतर खऱ्या अर्थाने या कामास वेग येईल, अशी अपेक्षा आ.पाटील यांनी व्यक्त केली आहे.२५ नोव्हेंबरपर्यंत महामार्गाकरिता आवश्यक डी.पी.आर.ची प्रक्रि या पूर्ण केली जाईल. त्यानुसार अंदाजे खर्च संकलित केला जाणार आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रि या सुरू केली जाईल. त्याचबरोबर यासाठी जमीन ताब्यात घेण्याच्या प्रक्रि येला प्रारंभ केला जाणार आहे. विविध कामांसाठी जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रि या एकत्रितपणे केल्याने या कामी वेळेची बचत होईल,असेही आ.पाटील यांनी स्पष्ट केले. निविदा जाहीर होईपर्यंत जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रि या पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर नवीन वर्षात या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हा महामार्ग लवकर व्हावा यासाठी कंबर कसली असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस भूपृष्ठ वाहतूक विभागाचे केंद्रीय सचिव, भूपृष्ठ वाहतूक विभागाचे वित्तीय प्रमुख व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आ.जयंत पाटील यांनी हे काम जानेवारीपासून सुरू करण्याची आग्रही मागणी या बैठकीत केली आहे.