शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: November 23, 2015 01:27 IST

माथेरान नगर परिषदेतील दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले.

अलिबाग : माथेरान नगर परिषदेतील दोन नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी दिले. अनधिकृत बांधकाम केल्या प्रकरणी एका तक्रार अर्जाबाबत हा महत्त्वपूर्ण निकाल शनिवारी देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसला हा फार मोठा धक्का असल्याचे बोलले जाते. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे कायदा धाब्यावर बसविणाऱ्यांसाठी ही फार मोठी चपराक आहे.दिलीप शामलाल गुप्ता आणि त्यांच्या पत्नी विनीता दिलीप गुप्ता अशी त्या नगरसेवकांची नावे आहेत. माथेरान नगर परिषदेची निवडणूक डिसेंबर २०११ ला पार पडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि शिवसेना या तीन पक्षांनी विकास आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढविली होती. प्रशासनाला सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलीप गुप्ता आणि विनीता गुप्ता यांनी खोटी माहिती देत प्रशासनाची दिशाभूल केल्याची तक्रार माथेरानच्या आशा कदम यांनी जिल्हाधिकारी रायगड यांना दिली होती. दिलीप गुप्ता यांचा दगडी कोळसा आणि लखनवी रेडिमेड कपड्यांचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे नेरळ ग्रामपंचायतीमध्ये ७०६/ब-१,७०६/ब-२ आणि ७०६/ब-३ अशा मिळकती आहे. यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात केला नसल्याचे तक्रारदाराने अर्जात नमूद केले होते. माथेरान बाजारपेठेमध्ये गुप्ता यांचे नरिमन चिक्की मार्ट नावाचे दुकान आहे. त्या दुकानाच्या इमारतीवर अनधिकृत पक्के बांधकाम केले आहे. माथेरान हे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जाहीर केलेले आहे. तळमजला अधिक एक मजला या व्यतिरिक्त कोणत्याही बांधकामाला परवानगी नाही, मात्र गुप्ता यांनी कायदे धाब्यावर बसवित दुसऱ्या मजल्याचे बांधकाम केले. या प्रकरणी माथेरान नगर परिषदेने गुप्ता यांना अनधिकृत बांधकामाबाबत नोटीसही पाठविली होती. त्याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सुरु होती. जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी शनिवारी याबाबतचा महत्वपूर्ण निकाल दिला.जिल्हा प्रशासनाच्या या निकालामुळे विकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फार मोठा धक्का बसला आहे.(प्रतिनिधी)