धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यालगत असलेल्या रोठ बुद्रुक व धाटाव ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक वसाहतीच्या मालकी जागेवर काहींचा डोळा असून, या ठिकाणी व्यवसायाकरिता सरकारी जागा गिळंकृत करून अनधिकृत पक्के बांधकाम राजरोसपणे सुरू झाल्याने खळबळ माजली आहे. औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यालगत सुरू असलेल्या नियमबाह्य अनधिकृत बांधकामांवर औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने रीतसर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.रोह्यात धाटावमध्ये औद्योगिक वसाहत स्थापन झाली आणि या विभागाला सोन्याचे दिवस आले. रोजीरोटीच्या निमित्ताने परगावातील हजारो कामगार या परिसरात भाडेतत्त्वावर राहतात, तर काहींनी विविध पद्धतीने व्यवसाय थाटले. रोहा-कोलाड रस्त्यालगत तर सरकारी जागेवर अतिक्र मण करून गाळे बांधले आहेत. हे बेकायदा गाळे भाडेतत्त्वावर देऊन वेगळ्या पद्धतीने कमाईचा नवा फंडा तयार केला. स्वत:चे छोटेमोठे उद्योग व सरकारच्या मोकळ्या जागेवर पक्के गाळे बांधले आहेत. याकडे औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
रस्त्यालगत अनधिकृत बांधकामे
By admin | Updated: February 22, 2016 00:42 IST