शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

उमरोली ग्रामपंचायतीचे डम्पिंग बंद

By admin | Updated: July 17, 2017 01:27 IST

उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील कचरा हा वावे गावच्या रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत होता.

कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील गावांमधील कचरा हा वावे गावच्या रहदारीच्या रस्त्यावर असलेल्या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून वावे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यामुळे वावे ग्रामस्थांनी हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीकडे तक्र ार केली होती. या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाने हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश दिल्याने हे डम्पिंग ग्राउंड शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आले आहे.उमरोली ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावांमधील कचरा आणि स्थानिक खासगी रुग्णालयातील जैविक कचरा या डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यात येत होता. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. पावसाळ्यात तर हा कचरा नदी आणि परिसरात पसरत आहे. त्यामुळे या डम्पिंग ग्राउंडला ग्रामस्थांनी विरोध केला होता. हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पंचायत समिती कर्जत आणि जिल्हा परिषद रायगड यांच्याकडे केली होती. त्यानुसार रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या जागेची पाहणी केली होती. ग्रामपंचायत ही स्थानिकांच्या आरोग्याबाबत कोणतीही काळजी घेत नसल्याचे यावरून दिसून आले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्जत यांनी हे डम्पिंग ग्राउंड दुसरीकडे हलवून हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचे आदेश उमरोली ग्रामपंचायतीला दिले होते. तसेच हे डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे, नारायण डामसे यांनीही पुढाकार घेतला होता. त्यानुसार शुक्र वारी १४ जुलै रोजी वावे गावाजवळ असलेले डम्पिंग ग्राउंड ग्रामपंचायतीने बंद केले आहे. यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त के ले आहे.