शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

उदो... उदोच्या गजरात देवींना निरोप

By admin | Updated: October 12, 2016 04:51 IST

जिल्ह्यातील ८३८ देवीच्या मूर्तींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ६८७ सार्वजनिक १५१ खासगी मूर्तींचा समावेश होता. त्याचप्रमाणे १६९ सार्वजनिक

अलिबाग : जिल्ह्यातील ८३८ देवीच्या मूर्तींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये ६८७ सार्वजनिक १५१ खासगी मूर्तींचा समावेश होता. त्याचप्रमाणे १६९ सार्वजनिक आणि एक हजार २०२ घटांची स्थापना करण्यात आली होती. त्यांचेही विसर्जन करण्यात आले. जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. तरु णाईला हवाहवासा वाटणाऱ्या नवरात्रोत्सवाची सांगता मंगळवारी झाली. जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रावणाच्या प्रतिमेचे दहन करु न विजयादशमीचा सण साजरा करण्यात आला. दसऱ्याच्या शुभेच्छा देऊन आनंदाचे सोने जिल्हाभर लुटण्यात आले. गेले नऊ दिवस नवरात्रोत्सवाची धुम सर्वत्र सुरु होती. तरु णांसह अबाल वृध्दही गरबा, दांडीयामध्ये चांगलेच रमून गेले होते. भजन, किर्तन, फॅन्सी ड्रेस, नृत्य स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्र माची रेलचेल नवरात्रोत्सवात पाहावयास मिळाली. महिलांसाठी पाककला स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. त्यांना महिलांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. अलिबागमधील विविध सार्वजनिक मंडळांनी दांडीया, गरबा नृत्यासाठी पास दिले होते. त्यामुळे कोणालाही थेट प्रवेश देण्यात आलेला नव्हता. महिला, तरु णींच्या सुरक्षेसाठी मंडळांनी हा निर्णय घेतला होता. त्याचे महिलावर्गाने स्वागत केले होते. मंडळांनी खबरदारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मंगळवारी सायंकाळी देवीच्या मूर्तींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. विविध मंडळांनी देवीच्या मूर्तींची मिरवणूक काढण्यासाठी वाहनांवर विद्युत रोषणाई केली होती. आकर्षक देखावेही उभारल्याचे दिसून आले. विसर्जन मिरवणुकीमध्ये गरबा, दांडीयाबरोबरच बॉलीवुड स्टाईलवरील ठेका धरला होते. अलिबागच्या समुद्र किनारी विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. खाद्यपदार्थाचे स्टालही खचाखच भरले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त होता. (प्रतिनिधी)