शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच रात्री दोन घरफोड्या

By admin | Updated: August 12, 2015 00:22 IST

रोहा तालुक्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांउला आहे. रोहा, कोलाड व ग्रामीण भागात दररोज अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत आहेत.

रोहा : रोहा तालुक्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांउला आहे. रोहा, कोलाड व ग्रामीण भागात दररोज अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत आहेत. चोरट्यांनी पुन्हा मोर्चा कोलाड विभागातील पुई, पुगाव गावाकडे वळविला आहे. पुगाव येथील बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरातील मुद्देमाल तर पुई येथील बंद घरातील दागिने व अन्य चीजवस्तू चोरल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.रोहा, कोलाड यासह ग्रामीण भागातील अनेकांची घरे फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. याचा तपास सुरू असतानाच चोरट्यांनी मोर्चा कोलाड व अन्य ग्रामीण भागाकडे वळविला. सुतारवाडी, साठलेवाडी, उडदवणे, सांगडे, यशवंतखार, मेंढा या ठिकाणी घरातील रोकड व मुद्देमाल चोरल्याचे समोर आले. या सर्व घटना ताज्या असतानाच पुन्हा शनिवारी रात्री पुगाव, पुई गावातील बंद घरावर चोरट्यांनी डाका टाकला. पुगाव येथील विमल कलमकर यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून घरातील ३५ हजार ५०० रुपयांचे मुद्देमाल तर पुई येथील किरण लहाने यांच्या बंद घरातील तब्बल १ लाख ८६ हजारांचे दागिने व अन्य ऐवज चोरल्याचे समोर आले आहे.तालुक्यात अनेक घरफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना अद्याप काहीच धागेदोरे सापडलेले लाही. त्यात शुक्रवारी रात्री शहरातील महाडकर यांच्या घरातील चोरीची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी पुन्हा पुई, पुगाव गावातील बंद घरावर दरोडा टाकून रोहा पोलिसांना नवे आव्हान उभे केले आहे. (वार्ताहर)