शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
4
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
5
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
6
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
7
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
8
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
9
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
10
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
11
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
12
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
13
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
14
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
15
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
16
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
17
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
18
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
19
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
20
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 

टेमपालेजवळ ट्रकला अपघात

By admin | Updated: March 19, 2016 00:46 IST

मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले गावाजवळ शुक्र वारी सकाळी ६.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. अपघातात ट्रकच्या केबिनचे तुकडे

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर टेमपाले गावाजवळ शुक्र वारी सकाळी ६.३० वाजता झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले. अपघातात ट्रकच्या केबिनचे तुकडे झाले आहेत.मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे याचे प्रत्यंतर शुक्रवारी सकाळी पुन्हा आले. कराडहून बोर्ली श्रीवर्धनकडे साखर घेऊन (ट्रक क्र मांक एमएच ०६ एक्यू १९७०) ट्रकचालक विशाल निगुडकर निघाला होता. सकाळी ६.३० वाजता टेमपाले गावाच्या हद्दीत आला असता भरधाव वेगात असलेल्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक वडाच्या झाडावर जोरात जाऊन आदळला. त्यामुळे ट्रकच्या केबिनचे नुकसान झाले. यावेळी मदतीसाठी मजीद लोखंडे धावून आले. मजीद यांनी चालकाला बाहेर काढले. अपघात एवढा भीषण होता की, ट्रकचा चुराडा झाल्याने चालक विशाल निगुडकर (३१, रा. भोस्ते), प्रसाद वाणी (२७, रा.सकलप) व विलास म्हात्रे (३०, रा. सकलप) हे जागीच ठार झाले.चालक विशाल निगुडकर याचे १७ एप्रिलला लग्न होणार होते अशी माहिती त्याचे नातेवाईक रेवती जवळेकर यांनी दिली. गोरेगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलीस निरीक्षक निशा जाधव उप विभागीय पोलीस अधिकारी दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. (वार्ताहर)