शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

कर्जतमध्ये आज फातिमामातेची यात्रा

By admin | Updated: October 16, 2016 03:24 IST

कर्जतमधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर (चर्च) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी १३ आॅक्टोबर नंतर येणाऱ्या रविवारी

- विजय मांडे,  कर्जतकर्जतमधील ख्रिश्चन धर्मियांचे प्रार्थना मंदिर (चर्च) गेल्या काही दशकांपासून फातिमा माऊलीच्या नावाने प्रसिद्ध आहे. प्रत्येक वर्षी १३ आॅक्टोबर नंतर येणाऱ्या रविवारी या मातेची तीर्थयात्रा असते. पूर्वी रेल्वे सेवेच्या फेऱ्या कमी होत्या त्यावेळी मध्य रेल्वे कडून काही विशेष गाड्या मुंबईहून कर्जतसाठी सोडण्यात येत असत. विशेष म्हणजे राज्यातील नव्हे तर देश परदेशातूनही ख्रिश्चन बांधव या यात्रेसाठी आवर्जून येतात. या रविवारी १६ आॅक्टोबर रोजी ही तीर्थयात्रा असल्याने सध्या यात्रेची जय्यत तयारी सुरु आहे.१९२० साली फातिमा माऊलीचा पुतळा पोर्तुगाल देशातील लिस्बन शहरापासून ११० किलोमीटर अंतरावर असलेल्या फातिमा नावाच्या छोट्या खेडेगावातून कर्जतमध्ये आणला. कर्जत रेल्वे स्थानका नजिकच्या प्रार्थना मंदिरामध्ये ठेवण्यात आला. याबाबतची अख्यायिका अशी आहे की, १३ मे १९१७ रोजी फातिमा गावातील जेसिंटा, फ्रांसिस व लुसिया ही तीन बालके आसपासच्या परिसरात आपली मेंढरे चारत असतांना पवित्र मरिया माऊलीने त्यांना दर्शन दिले. पुढील जुन, जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबर या पाच महिन्यात प्रत्येक १३ तारखेला याच तीन बालकांना मरिया माऊलीने पुन्हा दर्शन दिले व जगातील प्रत्येक मनुष्य पापापासून कसा वाचिवला जाईल व त्याला स्वर्गीय वैभव कसे प्राप्त होईल हा संदेश दिला. मरिया माऊलीने फातिमा गावात दर्शन दिल्याने तिला फातिमा हे नाव दिले.१९७ साली शेवटचे दर्शन १३ आॅक्टोबरला दिल्याने दरवर्षी १३आॅक्टोबरला रविवार आल्यास किंवा त्यानंतर येणाऱ्या रविवारी फातिमा माऊलीची तीर्थयात्रा कर्जतमध्ये भरते.यावेळी मुंबई, पुणे, नाशिक या शहरांसह महाराष्ट्रातून तसेच देश परदेशातून ख्रिश्चन धर्मिय बांधव फातिमा मातेच्या दर्शनासाठी आवर्जून येतात व कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात फिरून मौज मजाही करतात. या तीर्थयात्रेच्या निमित्ताने तालुक्यातील आदिवासी बांधव स्वत: पिकवलेल्या काकड्या चर्चच्या परिसरात आणून विक्रीसाठी ठेवतात. विशेष म्हणजे अन्य धर्मिय सुद्धा आपला नवस फेडण्यासाठी येथे उपस्थित असतात.कर्जतकरांचे फातिमामातेशी नातेकर्जत व फातिमा मातेचे नाते अगदी घट्ट आहे त्याचे कारण असे कि, श्रीमंत चिमाजी अप्पांनी वसई वर मोहीम आखली त्यावेळी वसई पंचक्रोशीत जी चर्च होती त्यांच्याकडे आपला मोर्चा वळविला त्या मोहिमेत काही चर्चचे मनोरे ढासळून गेले, काही चर्चच्या मनोऱ्यावरून मोठ मोठ्या घंटा आणण्यात आल्या त्यातील एक भली मोठी घंटा कर्जत मार्गे भीमाशंकरच्या शिखरावर नेली व नाना फडणविसांनी भीमाशंकराच्या हेमाडपंथी मंदिरात ती बसविली. या घंटेवर पवित्र मरिया माऊलीची छोटीशी मूर्ती कोरलेली आहे. त्यामुळे १७४० च्या सुमारासच मरिया माऊलीचे कर्जतशी नाते जुळले आहे.