शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये वीज पडून तिघे जखमी

By admin | Updated: November 24, 2015 01:58 IST

तालुक्यात रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या अवेळी पावसाने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने अंगावर

कर्जत : तालुक्यात रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या अवेळी पावसाने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसाने अंगावर वीज पडल्याने एकाच घरातील तिघे जखमी झाले आहेत, तर एका शेतकऱ्याचा बैल ठार झाला आहे. खांडस भागातील तुंगी येथील एका घरावर सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वीज पडल्याने त्या घरातील बाळू आसवले, त्यांच्या दोन मुली योगिता आणि नीता आसवले असे तिघे जखमी झाले. याची माहिती मिळताच खांडस येथील तलाठी संजय विशे, तेथील कारकून दाजी ऐनकर आणि दिनेश राणे यांनी तुंगी गाव गाठले. त्या तीन जखमींना प्रथम कशेळे आणि नंतर कर्जत येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र त्या तिघांची प्रकृती नाजूक असल्याने त्या सर्वांना पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. तर पेठ येथील शेतकरी शिवाजी पिंपरकर यांचा शेतामध्ये बैलाच्या अंगावर वीज पडल्याने तो ठार झाला.कर्जत - नेरळमध्ये पावसामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या असून वीजपुरवठा देखील खंडित झाला होता. माथेरानमध्ये रविवारी रात्रभर वीज गायब होती.(वार्ताहर)