शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:08 IST

एका विवाहितेला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाºयास व त्याच्या दोन सहकाऱ्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. उरण तालुक्यातील जसखार येथे राहणारी पीडित महिला २ मे रोजी मुलाला भेटण्यासाठी खालापूर तालुक्यातील मानकिवली येथे आली होती. या

कर्जत : एका विवाहितेला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार करणाºयास व त्याच्या दोन सहकाऱ्यांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.उरण तालुक्यातील जसखार येथे राहणारी पीडित महिला २ मे रोजी मुलाला भेटण्यासाठी खालापूर तालुक्यातील मानकिवली येथे आली होती. यावेळी एका हॉटेलमध्ये बसली असता, सूरज नावाच्या व्यक्तीने तिचा मोबाइल घेतला. तिने आरडाओरड केल्याने त्याने मोबाइल परत केला. त्यानंतर ती पतीसह निघून गेली.शुक्रवार १० मे रोजी पुन्हा मानकिवली येथे जाण्यासाठी महिला व तिचे पती कर्जत येथील भिसेगाव रिक्षा स्टँड येथे आले असता सूरजने तिला अडवले व फोन उचलत नसल्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. रात्री ती पतीसह ट्रेनने खोपोलीला जायला निघाली. यावेळी सूरज मित्रांसह धावत्या ट्रेनमध्ये चढला आणि त्याने पीडितेच्या पतीला मारहाण केली. पळसदरी स्थानक येताच विवाहितेला घेऊन ते तिघे उतरले. त्यानंतर वेताळ मंदिराच्या डोंगरावर तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी विवाहितेच्या पतीने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर अवघ्या दीड तासात पोलिसांनी आरोपी तिघांना ताब्यात घेतले आहे. सूरज अमरदीप चव्हाण, (रा. भिसेगाव), अजय प्रताप राठोड (रा.क्रांती नगर झोपडपट्टी), बबलू अशोक सिंग (रा. पुलाची वाडी - किरवली) यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Arrestअटक