शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

११७ मीटर लांब रोलवर हजारो स्वाक्ष-या!

By admin | Updated: April 23, 2015 06:57 IST

दादर येथील कवळी वाडीमधील पालिकेच्या मालकीच्या असलेल्या ३ हजार ४७ चौरस मीटर इतक्या मोठ्या भूखंडावर रुग्णालय उभारण्याची मागणी करत श्री वर्धमान स्थानकवासी

मुंबई : दादर येथील कवळी वाडीमधील पालिकेच्या मालकीच्या असलेल्या ३ हजार ४७ चौरस मीटर इतक्या मोठ्या भूखंडावर रुग्णालय उभारण्याची मागणी करत श्री वर्धमान स्थानकवासी जैनश्रावक संघ या संस्थेने जनआंदोलन उभारले आहे. त्याअंतर्गत गेल्या २० ते २५ दिवसांत संस्थेने ११७ मीटर लांब रोलवर हजारो स्वाक्षऱ्या जमा केल्या आहेत. स्वाक्षऱ्या केलेला रोल गुरुवारी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना सादर करण्यात येणार आहे.या प्रकरणी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे अ‍ॅड. मुकेश छेडा म्हणाले की, संबंधित भूखंड बिल्डरच्या घशात घालण्याचा पालिकेचा डाव होता. मात्र संस्थेने गेल्या ८ वर्षांपासून या भूखंडाचे संरक्षण केले आहे. इतकेच काय तर भूखंडावरील अतिक्रमणही रोखले आहे. कालांतराने भूखंडावर अतिक्रमण होऊन तो बिल्डरच्या घशात जाण्याचा धोका आहे. परिणामी भूखंडावर सुपर स्पेशालिटी सोयीयुक्त अहिल्याताई रांगणेकर रुग्णालय उभारण्याचा संस्थेचा मानस आहे.पालिकेच्या या भूखंडावर सध्या एकूण ८१ भाडेकरू राहत आहेत. त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी पालिकेने हा भूखंड केवळ १७ कोटी रुपयांत बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला होता. याउलट संस्थेला रुग्णालयासाठी भूखंड दिल्यास त्या ठिकाणी ११०० चौरस मीटर परिसरात रहिवाशांचे पुनर्वसन आणि उर्वरित जागेत १०० खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा दावा संस्थेने केला आहे. शिवाय ८१ कुटुंबांचे पुनर्वसन करून कुटुंबातील एका व्यक्तीला रुग्णालयात रोजगार देण्याची तयारीही संस्थेने दाखविली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे परिसरात असलेल्या नामांकित रुग्णालयांच्या सुविधा देणारे हे रुग्णालय ट्रस्टमार्फत चालवण्यात येणार आहे. त्यामुळे अतिसामान्य व्यक्तीलाही या ठिकाणी उपचार घेणे शक्य होईल, असा संस्थेचा दावा आहे.शाळेची गरजच काय?मुळात दादर परिसरात या भूखंडाच्या १ किमीच्या परिसरात तब्बल २१ शाळा आहेत. त्यामुळे या भूखंडावर शाळेचे आरक्षण ठेवण्याची गरज नसल्याचे संस्थेने सांगितले. कारण २०१४ साली भूखंडाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या समितीला उत्तर देताना पालिकेनेच हा दावा केलेला आहे. त्यामुळे शाळेचे आरक्षण रद्द करून या ठिकाणी रुग्णालय उभारण्याची परवानगी देण्याची मागणी संस्थेने केली आहे. (प्रतिनिधी)