शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळ्यात चोरी करणारा गजाआड

By admin | Updated: December 4, 2015 00:26 IST

शहरातील म्हसळा ग्रामीण रुग्णालयात १३ नोव्हेंबर २०१५ ला चोरट्याने नर्स विश्रांती कक्षात गेल्या असता त्यांच्या पर्समधून रोख रक्कम आणि एटीएम चोरून नेले. एसबीआयच्या

म्हसळा : शहरातील म्हसळा ग्रामीण रुग्णालयात १३ नोव्हेंबर २०१५ ला चोरट्याने नर्स विश्रांती कक्षात गेल्या असता त्यांच्या पर्समधून रोख रक्कम आणि एटीएम चोरून नेले. एसबीआयच्या एटीएममधून रक्कम काढण्यात आली. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला होता, या चोरट्याला पोलिसांना गजाआड करण्यात यश आले आहे.१३ नोव्हेंबर म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील नर्सच्या पर्समधून रोख रक्कम ३,५०० व दोन मोबाइल असा ११,५०० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला होता. तर दुसऱ्या दिवशी १४ नोव्हेंबर २०१५ ला ग्रामीण रु ग्णालयातील नर्स विश्रांती कक्षात गेल्या असताना त्यांच्या पर्समधून रोख रक्कम १,२०० व एटीएम कार्ड चोरून एसबीआयच्या एटीएममधून रोख रक्कम २२ हजार काढल्याची घटना घडली होती. चोराने एटीएममधून पैसे काढल्याने तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. म्हसळा पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज तपासून चोराला पकडण्याची मोहीम हाती घेतली. परंतु सीसीटीव्ही फुटेज अस्पष्ट असल्याने चोराचा फक्त गुलाबी रंगाचा टी शर्ट हीच ओळख पोलिसांकडे होती. १ डिसेंबरला आरोपी तोच टी शर्ट घालून म्हसळा मार्केटमध्ये फिरत होता. त्यावेळी पोलीस निरीक्षक एस. एम. शिंदे दिघी नाका येथे ड्युटीवर असणारे ट्रॅफिक हवालदार नरेंद्र थळे यांच्या सतर्कतेमुळे त्यांनी आरोपीला ओळखले, व आरोपीला ( मूळ रा. भार्इंदर , सध्या रा. म्हसळा ) अटक करण्यात आली. या आरोपीने दोन्ही गुन्हे कबूल केले असून म्हसळा पोलिसांनी आरोपीकडून दोन मोबाइल व रोख रक्कम १५ हजार रु पये त्याच्याकडून जप्त केले आहेत. (वार्ताहर)