शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

टँकरने ३६ गावे, १६५ वाड्यांना पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 02:51 IST

वाढत्या उन्हाळ््याबरोबर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष झपाट्याने वाढत आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत आहे.

- जयंत धुळप अलिबाग : वाढत्या उन्हाळ््याबरोबर जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष झपाट्याने वाढत आहे. पाण्याची समस्या दिवसेंदिवस अत्यंत उग्र स्वरूप धारण करीत आहे. जिल्ह्यातील उन्हाळी पाणीटंचाईग्रस्त गाव-वाड्या आराखड्यानुसार जिल्ह्यात ५०८ गावे आणि १ हजार ३०२ वाड्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाई जाणवणार आहे. जिल्ह्यातील ३६ गावे आणि १६५ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई असल्याने या सर्व ठिकाणी २० टँकर्सच्या माध्यमातून पिण्याचे पाणी पुरविण्यात येत असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.सद्यस्थितीतील तीव्र पाणीटंचाईग्रस्त ३६ गावे आणि १६५ वाड्यांपैकी सर्वाधिक २१ गावे आणि ६५ वाड्या एकट्या पेण तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत पोलादपूरमध्ये १० गावे व ७१ वाड्या, महाडमध्ये २ गावे व १७ वाड्या, कर्जतमध्ये ३ गावे व ४ वाड्या, रोहा व माणगाव तालुक्यात प्रत्येकी दोन वाड्या आणि श्रीवर्धन तालुक्यात चार वाड्यांमध्ये ही तीव्र पाणीटंचाईआहे.टँकरने पाणीपुरवठा करण्याबरोबरच विंधण विहिरी करून गावांत पाणी उपलब्ध करून देण्याच्या नियोजनानुसार जिल्ह्यातील ७४ गावे व २२१ वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यात येत आहेत. जलस्रोत बळकटीकरण योजनेबरोबरच ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेतून तलाव, बंधारे व धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात टाकून शेतजमिनी कसदार करण्याच्या कामास जिल्ह्यात गती प्राप्त झाली आहे.गतवर्षी जलयुक्त शिवाराची कामे यशस्वी झाल्याने जिल्ह्यातील १० गावे संपूर्ण पाणीटंचाईमुक्त झाल्याने यंदा या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर्स द्यावे लागले नसल्याचे सूर्यवंशी यांनी पुढे सांगितले.कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कोकणचा समावेश पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत करण्यात आला नव्हता. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी फाउंडेशनचे प्रमुख अमीर खान यांच्या उपस्थितीत बोलावलेल्या सभेत जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी रायगडमधील पाणीटंचाई लक्षात आणून दिले.त्यानंतर रायगडमध्ये प्री-वॉटर कपचे आयोजन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यांतील १४ गावांमध्ये ‘प्री-वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात या सर्व गावांतील ग्रामस्थ सक्रिय सहभागी झाले आहेत. आगामी वर्षी रायगडचा समावेश पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत पूर्णपणे असेल, अशी माहिती सूर्यवंशी यांनी पुढेदिली.पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ‘झिंक टँक’ संकल्पनाजिल्ह्यात यंदा ‘झिंक टँक’ संकल्पना प्रथमच राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यातील १७५ वाड्यांमध्ये या झिंक टँक बसविणे प्रस्तावित असून, त्या योगे या वाड्यांमधील उन्हाळी पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. सुमारे एक हजार लोकवस्तीच्या वाडीमध्ये ‘झिंक टँक’ बसविण्यात येईल. त्यामध्ये पावसाळ््यात पावसाचे पडणारे पाणी साठविण्यात येईल. संपूर्ण उन्हाळ््याच्या काळात एक हजार लोकवस्तीला पुरेल इतके पाणी साठविण्याची क्षमता या झिंक टँकची आहे. जलशुद्धीकरण व्यवस्थेतून हे पाणी वाडीवर उपलब्ध होणार असल्याचे डॉ.सूर्यवंशी यांनी अखेरीस सांगितले.