शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

खालापूर तालुक्यात पाणथळ जागांचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 23:57 IST

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : तालुकानिहाय समिती स्थापन; कर्जत तालुक्यात दहा पाणथळ जागा

खोपोली : मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड व रत्नागिरी या जिल्ह्यांतील पाणथळ जागांचे (वेट लॅण्ड) सर्वेक्षण सुरू आहे. या अंतर्गत जिल्हाधिकारी रायगड यांनी तालुकानिहाय समिती स्थापन करून सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानुसार कर्जत व खालापूर तालुक्यात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

खालापूरचे तहसीलदार ईरेश चप्पलवार व कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली या दोन तालुक्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या दोन स्वतंत्र समितींमध्ये डॉ. अपर्णा फडके, निखिल गवई, कपील अष्टेकर, डॉ. स्मिता गीध, प्रदीप कुळकर्णी, नंदकुमार तांडेल, अभिजित घरत व वैभव पटवर्धन यांचा समावेश आहे. या समितीत दोन्ही तालुक्यांचे नायब तहसीलदार, वन क्षेत्रपाल, तालुका कृषी अधिकारी यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. खालापूर तालुक्यात १२ व कर्जत तालुक्यात दहा पाणथळ जागांचे सर्वेक्षण करण्यासाठी डॉ. अपर्णा फडके व त्यांच्यासह अन्य अशासकीय सदस्यांनी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांसोबत शासकीय सदस्य व तलाठी यांच्यासोबत बैठका घेतल्या. या वेळी दोन्ही तहसीलदारांनी संबंधित शासकीय अधिकारी व तलाठी यांना आवश्यक ती माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून योग्य ते सहकार्य करण्याचे आदेश दिले.

खालापूर तालुक्यात आत्करगाव, सांगडे, करंबेळी, उसरोली, कुंभिवली, तांबाटी, नढाळ, लोधिवली, कलोते, मोकाशी, वडविहीर व भिलवले येथील पाणस्थळांचा समावेश आहे तर कर्जत तालुक्यात खांडपे, पाथरज, जामरुंग, बलिबरे, पाषाणे, पळसदरी, साळोख, कोदिवले, अवसुले व डिकसळ या गावातील पाणस्थळांचा अंतर्भाव आहे. डॉ. अपर्णा फडके या मुंबई विद्यापीठात भूगोलतज्ज्ञ आहेत.इराणमधील रामसर येथे २ फेब्रुवारी १९७१ रोजी जागतिक पाणथळ जागा समितीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून २ फेब्रुवारी हा दिवस जागतिक पाणथळ जागा दिन म्हणून साजरा करण्यात येतो, अशी माहिती डॉ. अपर्णा फडके यांनी दिली.

जैव विविधतेने नटलेल्या, परिपूर्ण अशा भारतातील २७ जागांचा जागतिक पातळीवर रामसर पाणथळ जागांमध्ये समावेश करण्यात आला आहे, असेही त्या म्हणाल्या.

मानवाच्या अनिर्बंध हस्तक्षेपामुळे निसर्गाचा ºहास होऊन संकट ओढावले - फडकेसर्वेक्षणाबाबत अधिक माहिती देताना डॉ. अपर्णा फडके यांनी मानवाच्या अनिर्बंध हस्तक्षेपामुळे ढासळलेला नैसर्गिक समतोल, जागतिक तापमान वाढ, त्सुनामी यामुळे अवर्षण व अतिवर्षण अशा समस्या निर्माण होत असून मानवजात संकटात आली आहे, असे सांगितले.नैसर्गिक समतोल राखण्यात पाणथळ जागांची मोठी भूमिका आहे, असे स्पष्ट करून किनारपट्टीलगतच्या पाणथळ जागांमध्ये भरतीच्या लाटांची तीव्रता कमी करण्याची क्षमता असते. या जागा नैसर्गिक अन्न साखळीतील असंख्य जीवांचे आश्रयस्थान असतात.सूक्ष्म जीवांपासून प्राणी, पक्षी, वनस्पती यांचे जीवन त्यावर अवलंबून असते. पाण्यातील दूषित घटक शोषून जलशुद्धीकरणाचे कार्य या जागा नैसर्गिक रीतीने करीत असतात. यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण व संवर्धन करण्याची गरज असल्याचे फडके यांनी सांगितले.