शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत तंबाखूयुक्त ३५ लाखांचा माल जप्त

By admin | Updated: November 9, 2016 03:59 IST

परराज्यातील उत्पादकांकरिता रायगड जिल्हा बनावट सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्रीची मोठी बाजारपेठ असल्याचे गेल्या सहा महिन्यांत

जयंत धुळप, अलिबागपरराज्यातील उत्पादकांकरिता रायगड जिल्हा बनावट सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्रीची मोठी बाजारपेठ असल्याचे गेल्या सहा महिन्यांत रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या धाडसत्रांतून समोर येत आहे. गेल्या १ एप्रिलपासून ३१ आॅक्टोबर या सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने टाकलेल्या छाप्यांमध्ये तंबाखूयुक्त ३५ लाख ७९ हजार रुपये किमतीचा बनावट माल जप्त केला असून रायगड जिल्ह्याच्या इतिहासातील ही विक्रमी नोंद आहे. शनिवारी ५ नोव्हेंबर रोजी नागोठणे येथील मे. नेहल स्टोअर्स येथे छापा टाकून ८४ हजार ८०० रुपये किमतीची बेकायदा घोडा छाप तपकीर आणि ७ हजार ६८० रुपये किमतीच्या मैना या बेकायदा विडीचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती रायगड अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त दिलीप संगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ व त्या अंतर्गत नियम २००८ नुसार सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा छापणे हे १ एप्रिल २०१६ पासून बंधनकारक करण्यात आले असून या नियमाची अंमलबजावणी या प्रशासनातर्फे यशस्वीरीत्या करण्यात येत आहे. रायगड अन्न व औषध प्रशासनाच्या रायगड(पेण) कार्यालयास रोहा तालुक्यात तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा न छापता त्या उत्पादनाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली होती. त्या माहितीची खातरजमा करुन शनिवारी नागोठणे येथील मे. नेहल स्टोअर्स येथे छापा टाकू न या दुकानाची तपासणी केली असता या ठिकाणी तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा छापणे बंधनकारक असताना सुध्दा घोडा छाप तपकिरीच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर तसेच तन्मय विडीच्या वेष्टनावर ८५ टक्के भागावर वैधानिक आरोग्य इशारा छापलेला आढळून आला नाही. परिणामी घोडा छाप तपकीर व तन्मय विडीचा हा एकूण ९२ हजार ४८० रुपये किमतीचा साठा जप्त केल्याचे संगत यांनी स्पष्ट केले.या प्रकरणी उत्पादकास नोटीस पाठविण्यात आली असून उत्पादकाचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ व त्या अंतर्गत नियम २००८ नुसार पुढील कारवाई करण्यात येईल. नागोठणे येथील ही कारवाई सहाय्यक आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) दिलीप संगत यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी केली.