शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

कनपट्टीला बसून कामे करून घ्या

By admin | Updated: October 13, 2016 04:00 IST

रस्त्यावर खड्डे पडले म्हणण्यापेक्षा सरकारच्या कनपट्टीला बसून रस्त्यांची काम करून घ्या, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या

रोहा : रस्त्यावर खड्डे पडले म्हणण्यापेक्षा सरकारच्या कनपट्टीला बसून रस्त्यांची काम करून घ्या, असे आदेश शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदार, खासदार व मंत्र्यांना दिले. आर्थिक निकषांनुसार आरक्षण देण्याची शिवसेना प्रमुखांची मागणी तेव्हा मानली असती तर आज ही वेळ आली नसती. त्यामुळे आता जातीवरच आरक्षण द्यावे लागेल तेही इतर कुणाचेही आरक्षण न हलवता असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.शिवसेनेच्या वतीने ५००० विद्यार्थ्यांना टॅब वितरण व फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रोहा येथील भव्य मेळाव्यात करण्यात आले. त्या प्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री अनंत गीते, संपर्क प्रमुख आदेश बांदेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भरत गोगावले, आमदार मनोहर भोईर, आमदार अनिल परब, जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई, रवी मुंढे, किशोर जैन, संजय देशमुख, भेलचे अध्यक्ष अतुल सोबती आदि उपस्थित होते.विरोधकांचा उल्लेख न करता त्यांना आगामी निवडणुकीत नेस्तनाबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सिंचन घोटाळ्याचे पाणी यांच्या आता नाकातोंडात गेले आहे. जाऊ तिथे खाऊ वाल्यांना स्वच्छ रोहा योजनेत या निवडणुकीत साफ करून टाका असे सांगत आता लोकसभेत हारले ते आता नगरपालिकेला जरी उभे राहिले तरी पडतील असा टोला लावला. टॅबमध्ये एक पैशाचा घोटाळा दिसला तरी मी जबाबदार आहे असे ठणकावले.डॉ. चिंतामणराव देशमुख शहर सभागृहासमोरील पटांगणात झालेल्या या सभेस दहा हजाराहून अधिक शिवसैनिक उपस्थित होते. मेडिकल क्लिनिकचे लोकार्पण झाल्यावर धामणसई व भालगाव शाळेतील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात टॅब वितरण करण्यात आले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमधून आलेल्या कार्यकर्त्यांचे सेनेत स्वागत केले.