शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन महसूल कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन

By admin | Updated: April 13, 2016 01:29 IST

तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे तहसील कार्यालयात कामासाठी तालुक्यांतून आलेल्या नागरिकांना

श्रीवर्धन : तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी लेखणी बंद आंदोलन केले. यामुळे तहसील कार्यालयात कामासाठी तालुक्यांतून आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन कराव लागला. या लेखणी बंद आंदोलनात श्रीवर्धन प्रांत कार्यालय व तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी सामील झाले होते. प्रांत कार्यालय आणि तहसील कार्यालयातील आवल्ल कारकून ६, लिपिक १५, शिपाई ८ असे एकूण २९ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.महाडमध्ये लेखणी बंद आंदोलनमहाड : प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रांताधिकारी व तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. सोमवारी ११ एप्रिलला सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपले कामकाज केले. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी मुंढेकर यांनी दिली. कर्जतमध्ये आंदोलनाला प्रतिसादकर्जत : नायब तहसीलदार संवर्गातील सर्व पदे पदोन्नतीने भरण्यात यावीत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नायब तहसीलदार अशा विविध मागण्यांसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी शासन दरबारी मागणी केली आहे. परंतु शासनाने त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करीत शासनाचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या जिल्हा शाखा रायगडच्यावतीने मंगळवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. मुरुड महसूल कर्मचारी आंदोलनात सहभागीमुरुड : मुरुड तहसीलदार कार्यालयातील तहसीलदार, नायब तहसीलदार वगळता मंगळवारी (१२ एप्रिल) २५ महसूल कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलनात भाग घेतला. एरव्ही तहसील कचेरीसमोर दिसणारी गर्दी मंगळवारी नव्हती. तथापि तालुक्यातून लांबून आलेल्या नागरिकांची गैरसोय टाळावी म्हणून अ‍ॅफिडेव्हिट तसेच चॅप्टर केसेसची कामे मार्गी लावायचे महसूल निवासी तहसीलदार दिलीप यादव यांनी सांगितले.