शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, शेकापची प्रतिष्ठेची लढत

By admin | Updated: February 17, 2017 02:13 IST

तालुक्यातील सात मतदार संघातून सर्वाधिक सात उमेदवार निवडून जाणार असल्याने शेकापसह शिवसेना-काँग्रेस आघाडीने

अलिबाग : तालुक्यातील सात मतदार संघातून सर्वाधिक सात उमेदवार निवडून जाणार असल्याने शेकापसह शिवसेना-काँग्रेस आघाडीने याकडे लक्ष केंद्रित केले आहे. मतदानाची तारीख जवळ येत आहे, तशी प्रचारात रंगत वाढत आहे. थळ मतदार संघामध्ये चुरशीची लढत होणार असल्याने शिवसेना, शेकापने येथील लढत प्रतिष्ठेची केली आहे.अलिबाग तालुक्यामध्ये काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा यांनी आघाडी केली आहे, तर शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला जवळ केले आहे. शहापूर, मापगाव, चेंढरे, बेलोशी जिल्हा परिषद मतदार संघ काँग्रेस लढवत आहे, तर चौल, थळ, कुडूर्स जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे थळ, वरसोली, कुडूर्स, आंबेपूर, चेंढरे, खंडाळे, रामराज पंचायत समिती शिवसेना, मापगाव, आवास, रेवदंडा, बेलोशी काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे शहापूर मतदासंघातील प्रत्येकी एक-एक काँग्रेस आणि शिवसेना लढत आहे. नागाव पंचायत समिती भाजपाला सोडली आहे.शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीची एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाराज पदाधिकारी, कार्यकर्ते शेकापला मनापासून मदत करणार का? हा प्रश्न आहे. शेकापने त्यांना एकही जागा न सोडल्याने त्यांचे अस्तित्वच संपल्यासारखे आहे. त्यांच्या नाराजीचा फटका कमी-अधिक प्रमाणात शेकापच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना, भाजपा एकत्र आल्याने त्यांची ताकत वाढलेली आहे. एकमेकांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी प्रचाराचे रान पेटवले आहे. मतदार संघात सभा, बैठका, रॅली, मतदारांना घरी जाऊन भेटणे अशा प्रचाराला सुरुवात झाली आहे. घराघरांत जाऊन विविध पत्रके वाटली जात आहेत. पुढील दोन दिवसांमध्ये महत्त्वांच्या नेत्यांच्या सभा मतदार संघात लावल्या आहेत. थळ मतदार संघातील शिवसेनेच्या उमेदवार मानसी दळवी या अध्यक्षपदाच्या प्रमुख दावेदार मानल्या जातात. त्यांच्याविरोधात शेकापने चित्रा पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार आहे. येथील लढत प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. चित्रा पाटील यांना कुडूर्स मतदार संघातूनही उमेदवारी दिली आहे. आमदार सुभाष पाटील यांच्या पत्नी सुश्रूता पाटील यांना शहापूरमधून उमेदवारी दिली आहे. (प्रतिनिधी)