शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महसूलने जप्त केलेल्या साठ्यातून वाळूचोरी

By admin | Updated: December 6, 2015 00:15 IST

रॉयल्टी संपली तरी अनधिकृत वाळूसाठा सापडल्याप्रकरणी महाड तहसीलदार यांच्याकडून सापे तर्फे गोविर्ले प्लॉटधारकांवर कारवाई करीत हजारो ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती.

दासगांव : रॉयल्टी संपली तरी अनधिकृत वाळूसाठा सापडल्याप्रकरणी महाड तहसीलदार यांच्याकडून सापे तर्फे गोविर्ले प्लॉटधारकांवर कारवाई करीत हजारो ब्रास वाळू जप्त करण्यात आली होती. त्यातील सात प्लॉटधारकांनी जप्त केलेल्या वाळूमधून काही ब्रास वाळू चोरी केल्याची तक्रार महाडचे मंडल अधिकारी संजय माने यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार सात प्लॉटधारकांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावित्री खाडीत २०१३-१४ मध्ये हातपाटी वाळू उत्खननाची मुदत ८ जून २०१४ रोजी संपली होती. मुदत संपली असतानाही ३४६, ३०४, २२६, २२७, ३७२ या प्लॉटधारकांच्या प्लॉटवर २,११४ ब्रास वाळूचा अनधिकृत साठा सापडला होता. हा साठा महाड महसूल विभागाने जप्त केला होता. महाड तहसील कार्यालयाकडून १३ जुलै २००७ रोजी जप्त वाळूसाठ्याची पाहणी करण्यात आली. यावेळी सात प्लॉटधारकांच्या जप्त केलेल्या वाळूसाठ्यातून ८५९ ब्रास वाळू कमी सापडली. वाळू चोरीप्रकरणी प्लॉटधारक सुफियान इरफान (रा. मुंबई), अबजार फजल काझी (रा. तुडील), अखलाक हसन हसवारे (रा. आंबेत), विनोद शहा (रा. मुंबई), सादिक रहीमद्दीन अनवारे (रा. दासगांव), जनार्दन भोईर (रा. पेण), संतोष सावंत सापे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जुलैत जप्त वाळूसाठ्याची पाहणी केली, मात्र सर्व कागदपत्रे महाड तहसील कार्यालयात असल्याने मंडल अधिकारी गुन्हा दाखल करू शकले नाहीत. यामुळे त्यांनी कार्यालयाकडे अर्ज केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आल्याने त्यास विलंब लागला.- संदीप कदम, तहसीलदार, महाड.