शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गालगतच्या गावाचा रस्ता खचला

By admin | Updated: November 6, 2016 04:08 IST

मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बारवई गावासमोरील रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना दिवसाआड अपघात होत आहेत. बारवई ग्रामस्थांनी

मोहोपाडा : मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील बारवई गावासमोरील रस्ता पूर्णपणे खचला आहे. रस्त्यावरून वाहन चालवताना दिवसाआड अपघात होत आहेत. बारवई ग्रामस्थांनी याबाबत आयआरबीच्या अधिकाऱ्यांशी अनेकदा संपर्कसाधला आहे. मात्र प्रत्येक वेळी आठवडाभरात रस्त्याचे काम करू, असे आश्वासन गेल्या दोन महिन्यांपासून दिले जात आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे चालक, नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्याच्या दुर्दशेमुळे अपघातांची संख्याही वाढली असून यात दुचाकी अपघातांची संख्या मोठी आहे. मुंबई-पुणे महामार्गांवर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. बारवई गावाचे प्रवेशद्वार मुख्य वाहतूक रस्त्यालगतच असल्याने ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. शिवाय बारवई गावालगतच्या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव चालवली जातात. त्यातच येथील रस्ता खचल्याने अपघाताला आमंत्रण मिळत आहे. नवरात्रोत्सवापासून अंदाजे पन्नासपेक्षा अधिक दुचाकींचा याठिकाणी अपघात झाल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. रस्ता दुरुस्तीसाठी बारवई ग्रामस्थांनी अनेकवेळा आयआरबीचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता केवळ टाळाटाळ करण्यात येते. येथील रस्त्याची बिकट अवस्था पहाता, मोठी दुर्घटना घडल्यावरच संबंधित विभागाचा जाग येणार का, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. बारवईजवळील रस्त्याची देखरेख, नियंत्रणासाठी भिंगारवाडीजवळ टोलनाका आहे. टोल घेतला जात असतानाही बारवई गावासमोरील रस्त्याकडे दुर्लक्ष का, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. (वार्ताहर)मुंबई-पुणे महामार्गावरील बारवई गावासमोरील खचल्याच्या रस्ताचे काम तीन ते चार दिवसातच सुरू करतो. तसेच लोणावळा ते पनवेल या रस्त्याला पुन्हा डांबरीकरण करण्याचे काम लवकरच सुरू होईल.- श्रीनिवास शिंदे, आयआरबीचे अधिकारी.