शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडमध्ये नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 03:00 IST

गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यात सुधागडात मुसळधार पावसाने तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाली : गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात धुवाधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. त्यात सुधागडात मुसळधार पावसाने तालुक्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. तर सतत तीन वेळा अंबा नदीवरील पाली, भेरव, जांभूळपाडा पुलावरून पाणी गेल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वाकण, पाली, खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पाली-भिरा मार्गावरील सरस्वती नदीने नांदगाव येथील पूल सहा तास पाण्याखाली गेला होता त्यामुळे नांदगाव पंचक्र ोशीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी एकच पूल असल्याने विभागातील ग्रामस्थांची व विद्यार्थ्यांची गैरसोय झाली. तसेच मानखोरे विभागातील भेलीव तर सिध्देश्वर भार्जे येथील वलका नदी सुध्दा पूरमय झाली होती. तसेच पाली बसस्थानकाला तलावाचे स्वरूप आले होते. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या बसेसने इतरत्र थांबा घेतला. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. महामंडळाने पाली बसस्थानक परिसरात बांधलेले कंपाऊंड वॉल पूर्णपणे बंदिस्त केल्याने पाणी जाण्यासाठी गटार लाइन न ठेवल्याने अतिवृष्टी झाल्यास पालीचे बसस्थानक तुडुंब भरते, त्यामुळे येथील पाणी जाण्यास उपाययोजना करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सोमवारी सुधागडमध्ये पूरस्थिती होती ती आजही पाऊस न थांबल्याने जैसे थे होती. हवामान खात्याने येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी भात, नाचणी, वरी लावणीची ही कामे सध्या थांबली आहेत. हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शेतकरी चिंतातुर झाले आहेत.