शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
2
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
7
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
8
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
9
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
10
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
11
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
12
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
13
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
14
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
15
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
16
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
17
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
18
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
20
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP

भूस्खलनाचा धोका १०३ गावांना, धोकादायक गावांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 03:10 IST

जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका (लँडस्लाइड प्रोन) असल्याचा अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे.

- जयंत धुळप अलिबाग : जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका (लँडस्लाइड प्रोन) असल्याचा अहवाल भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने रायगड जिल्हा प्रशासनास दिला आहे. यापैकी तीव्र धोकादायक श्रेणीत ९, अतिधोकादायक श्रेणीत ११, धोकादायक श्रेणीत ८३ गावे असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, यंदा पाऊस सुरू होण्यापूर्वी या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यासाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आदीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जुलै २००५ मध्ये भूस्खलन व दरड कोसळून झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने शिफारस केल्यानुसार दरडप्रवण क्षेत्रात रचनात्मक आणि अरचनात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.दरडप्रवण अर्थात भूस्खलनाचा धोका असणाऱ्या १०३ गावांपैकी सर्वाधिक ४९ गावे महाड तालुक्यात आहेत. उर्वरित तालुक्यांत पोलादपूर तालुक्यात १५, रोहा-१३, म्हसळा-६, माणगाव-५, सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल प्रत्येकी ३, श्रीवर्धन तालुक्यात २, तर तळा तालुक्यात एका गावाचा समावेश असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.१०३ गावांतील ग्रामस्थांना प्रशिक्षित करण्यासाठी १६ मे रोजी रोहा, १७ मे रोजी माणगाव येथे, १८ मे रोजी महाड येथे तर १९ मे रोजी पोलादपूर येथे प्रशिक्षण कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, मुख्याध्यापक, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक आदी एकूण ५१५ प्रमुख समाजघटकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. हे ५१५ प्रमुख समाजघटक पुढे गावात जाऊन ग्रामस्थांना प्रशिक्षित करतील आणि संभाव्य आपत्तीप्रसंगी करायचे नियोजन सर्वांना सांगणार आहेत. पावसाळ्यात दरड कोसळल्यावर परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येते, अशा वेळी घ्यावयाच्या काळजीबाबतही या वेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.>तातडीच्या कामांकरिता जिल्हाधिकाºयांचे निर्देशदरडप्रवण गावांमधील डोंगर उताराकडील बाजूस डोंगर कापण्याचे काम करू नये, पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पाणी वाहून नेणाºया मार्गातील अडथळे दूर करावे, पावसाळी हंगामात जमिनीस भेगा पडणे, अस्थिर भूभाग असणे यावर लक्ष ठेवून जनजागृती करणे, डोंगर उतारावरील मोठे दगड हटवणे, ही कामे तत्काळ सुरू करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. दरम्यान, सध्याच्या तप्ततेत तापणारे खडक व कातळ आणि पहिल्या पावसाचे त्यावर पडणारे पाणी यातून खडक फुटण्याच्या संभाव्य धोक्याचेदेखील सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे त्यांनी अखेरीस सांगितले.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या सर्वेक्षणानुसार तालुकानिहाय गावेमहाड ०५ ०६ ३८ ४९पोलादपूर ०० ०२ १३ १५रोहा ०० ०२ ११ १३म्हसळा ०२ ०० ०४ ०६माणगाव ०० ०० ०५ ०६पनवेल ०० ०० ०३ ०३खालापूर ०१ ०० ०२ ०३कर्जत ०१ ०० ०२ ०३सुधागड ०० ०० ०३ ०३श्रीवर्धन ०० ०१ ०१ ०२तळा ०० ०० ०१ ०१एकूण ०९ ११ ८३ १०३दरड कोसळण्यास अतिवृष्टी हे एक महत्त्वाचे कारण असून कमी वेळेत ५०० मि.मी.पेक्षा जास्त पाऊस झाल्यास दरड कोसळण्याची शक्यता अधिक असते.दरडग्रस्त गावातील नागरिकांनी जवळच्या महसूल मंडळस्तरीय पर्जन्यमापक यंत्रावरील दैनंदिन पावसाच्या नोंदीची माहिती घेऊन अतिवृष्टी होत असल्यास स्थलांतरित व्हावयाचे आहे.